कमी पैशात अधिक लाभ देणारे हे आहेत पाच व्यवसाय
कमी पैशात अधिक लाभ देणारे हे आहेत पाच व्यवसाय, केवळ 20 हजार रुपयात सुरु करी हे व्यवसाय(profitable business in low investment)
मुंबई : कोरोना महामारीमुळे जगाचीच आर्थिक घडी विस्कटली आहे. आर्थिक मंदी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. या मंदीमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. यामुळे जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता नाही. आम्ही तुम्हाला काही आयडिया सांगत आहोत ज्या कदाचित तुमच्या फायद्याच्या ठरु शकतात. आम्ही तुम्हाला अशा पाच व्यवसायाची माहिती देणार आहोत. यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणुकीची आवश्यकता नाही. केवळ २० हजार रुपयांत हे व्यवसाय सुरु करु शकता. जाणून घेऊया अशा व्यवसायांबाबत जे तुम्ही घरुनही करु शकता.(profitable business in low investment)
होम बेकरी
जर तुम्हाला केक किंवा बेकरी प्रोडक्टस बनवता येत असतील तर तुम्हाला काही अडचण नाही. तसेच तुम्ही केक बनवणारे कामगार ठेवूनही हा व्यवसाय करु शकता. यासाठी तुम्हाला अधइक गुंतवणुकीची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या हा व्यवसाय करु शकता. केक, बेकरी प्रोडक्ट्समध्ये फायदा अधिक असतो.
गिफ्ट बास्केट
आधुनिक समाजात गिफ्ट देण्याच्या पद्धतीतही बदल होत आहेत. हल्ली गिफ्ट बास्केट किंवा क्रिएटिव्ह गिफ्ट देण्यावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे व्यवसाय करायचा असल्यास गिफ्ट बॉक्सचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. यात तुम्हाला एक बास्केट तयार करुन त्याला सजवायचेय यात खाण्याचे सामान टाकून गिफ्ट तयार करु शकता. हा व्यवसाय जर तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून केला तर तुम्हाला अधिक ग्राहक मिळू शकतात आणि यातून तुम्हाला लाभ अधिक होईल.
पर्सनल गिफ्ट
आता अनेक प्रकारचे पर्सनलाईज गिफ्ट बाजारात उपलब्ध आहेत. यात लोक आपल्या नाव किंवा फोटो टाकून हे गिफ्ट तयार करतात. उदा. अनेक लोक उशी, कप, टी-शर्ट आदींवर नाव किंवा फोटो प्रिंट करतात. अशा गिफ्टचा हल्ली ट्रेंड आहे त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय करु शकता. यातूनही तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.
मास्क
कोरोना आल्यानंतर मास्क हे आता दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू बनले आहे. यामध्ये सूती मास्कला लोक अधिक पसंती देताना दिसतात. सूती मास्कची सर्वाधिक विक्री होतेय. तुम्हाला घरबसल्या व्यवसायास हे ही उत्तम पर्याय आहे. मास्क तयार करुन विकण्याचा व्यवसाय तुम्ही करु शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला अधिक गुंतवणुकीची गरज नाही. तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरु करु शकता.
सेंद्रिय उत्पादने
हल्ली लोक आरोग्याकडे अधिक लक्ष देऊ लागलेत. भेसळयुक्त खाद्यपदार्थ टाळून सेंद्रिय उत्पादनांवर अधिकाधिक भर देत आहेत. नैसर्गिक आणि पौष्टिक उत्पादनांना लोकांची पसंती अधिक असल्याने तुम्ही हा पर्यायही निवडू शकता. सेंद्रिय उत्पादनाचा व्यवसाय करीत लोकांपर्यंत हे सामान पोहचवू शकता. ग्रामीण भागातून ही उत्पादने मागवून लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केल्यास यातही तुम्हाला चांगला नफा मिळेल. (profitable business in low investment)
‘BookMyShow’ ने सुरु केली व्हिडिओ ऑन डिमांड सर्व्हिसhttps://t.co/sSp7M0ggr7#BookMyShow |#demandservice |#buyorrent
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021
इतर बातम्या
शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी तेजी; गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 2.62 लाख कोटींची वाढ
‘व्यापाऱ्यांची ‘भारत बंद’ची हाक; जीएसटीविरोधात 26 फेब्रुवारी रोजी चक्काजाम!