पीएफ खात्याने दिला झटका, क्लेम रिजेक्ट झाला? ही चूक पडली बघा महागात
PF Account Problem | पीएफ खात्यातील रक्कम काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे का? तुमचा क्लेम रिजेक्ट होत आहे का? दावा फेटाळण्याची कारण पण समोर आली आहेत. सदस्यांच्या किरकोळ चुकांचा त्यांना फटका बसत आहे. जवळपास 3 मधील एक दावा फेटाळल्या जात आहे. कोणती आहेत ही कारणं?
नवी दिल्ली | 12 March 2024 : PF चे अंतिम दावे निकाली (Final Settlement) काढताना अडचणी येत आहेत. फायनस सेटलमेंट क्लेम रिजेक्टचे प्रमाण वाढले आहे. पाच वर्षांत हे प्रमाण 13 टक्क्यांहून 34 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. याचा अर्थ तीनपैकी एक दावा फेटाळण्यात येत आहे. EPFO च्या आकडेवारीनुसार, वर्ष 2022-23 मध्ये 73 लाख 87 हजार अंतिम दावे आले होते. यामधील 34 टक्के म्हणजे 24 लाख 93 हजार फेटाळण्यात आले. पण खात्यातील रक्कम काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामागे सदस्यांच्या किरकोळ चुका महागात पडत असल्याचे समोर आले आहे. कोणत्या आहेत या किरकोळ चुका?
ऑनलाईन प्रक्रियामुळे आकडा वाढला
ईपीएफओ (EPFO) अधिकाऱ्यांनुसार, दावा फेटाळण्याचे कारण, ऑनलाईन प्रक्रिया वाढल्याने गोंधळ उडाल्याने झाल्याचे सांगितले. पूर्वी कंपनी या दाव्याचे कागदपत्र पडताळत होते. त्यानंतर ईपीएफओकडे ही कागदपत्रे येत होती. आता ती आधार कार्डशी जोडण्यात आली आहे. तर सदस्यांना युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांक पण देण्यात आला आहे. सध्या 99 टक्के क्लेमचा ऑनलाईन पद्धतीनेच निपटारा करण्यात येत आहे.
24.93 लाख क्लेम रिजेक्ट
अधिकृत आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2022-23 दरम्यान 73.87 लाख अंतिम दावे निकाली काढण्यात आले आहेत. यामध्ये 24.93 लाख क्लेम रिजेक्ट करण्यात आले. ते एकूण दाव्याच्या 33.8 टक्के आहेत. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये हा आकडा 13 टक्के तर 2018-19 मधील आकडेवारी 18.2 टक्के होता. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये दावे फेटाळण्याची टक्केवारी 24.1 तर 2020-21 मध्ये 30.8 तर 2021-22 मध्ये 35.2 टक्के दावे फेटाळण्यात आले.
छोट्या-छोट्या चुका महागात
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, दाव फेटाळण्याचे अनेक कारणं आहेत. दावा फेटाळण्याविषयी ईपीएफओच्या संचालक मंडळाने पण चिंता व्यक्त केली आहे. पूर्वी ईपीएफओचे हेल्प डेस्क कर्मचारी अर्जात सुधारणा करण्यासाठी मदत करत आहेत. या अत्यंत किरकोळ चुका आहेत. स्पेलिंगमधील चूक, पीएफ खाते क्रमांकात चूक वा इतर चुका महागात पडत आहेत. पैशांची चणचण असतानाही या चुकांमुळे त्यांना वेळेत रक्कम काढता येत नाही. उलट त्यांचा दावा या चुकांमुळे फेटाळल्या जात आहे.