Government Bank : सरकारी बँकांनी पुसला हा कलंक! अशी बजावली कामगिरी

Government Bank : सरकारी बँकांनी कात टाकली आहे. सरकारी बँकांनी भुतो न भविष्यती अशी कामगिरी बजावली आहे...

Government Bank : सरकारी बँकांनी पुसला हा कलंक! अशी बजावली कामगिरी
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 7:38 PM

नवी दिल्ली : सरकारी बँकांमध्ये (Government Bank) वेळेवर कधीच काम होत नाही, सुविधा मिळत नाही, गतीने काम होत नाही. खासगी बँकांसारखी जलद सेवा मिळत नाही, अशा अनेक तक्रारींचा सूर या बँकांविरोधात असतो. त्यात काही प्रमाणात तथ्य पण आहेत. ग्रामीण भागात तर त्यांच्या सेवांबाबत मोठी नाराजी आहेत. पण याच सरकारी बँकांनी स्वतःवरील एक कलंक पुसला आहे. देशातील सरकारी बँका तोट्यात जाणे आणि कोणत्याही व्यावसायिकांनी त्यांना चूना लावणं हे गणित ठरलेलं होतं. पण गेल्या पंचवार्षिकमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी (Public Sector Bank) या आरोपांना छेद दिला आहे. कधी काळी मोठा तोटा सहन करणाऱ्या बँकांनी मोठा नफा (Profit) कमाविला आहे.

एकट्या एसबीआयचे इतके योगदान PTI च्या अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात (2022-23) सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे पीएसबी बँकांनी नफा कमविण्यात मोठा रेकॉर्ड केला. या बँकांना सामुहिकरित्या 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये अर्धी हिस्सेदारी एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियाची आहे. याचा अर्थ जेवढा नफा देशातील 11 सरकारी बँकांनी कमाविला. त्यातील अर्धा वाटा एकट्या एसबीआयचा आहे.

5 वर्षांपूर्वी झाला होता तोटा सरकारी बँकांच्या आर्थिक लेखाजोख्यावर नजर टाकली तर गेल्या काही दिवसांमध्ये या बँकांनी खूप मोठा पल्ला गाठल्याचे दिसून येईल. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये या सरकारी बँका केवल तोट्यात होत्या. या कालावधीत सरकारी बँकांना एकूण 85,390 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. पण आता ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या बँकांनी 1,04,649 कोटी रुपयांचा नफा कमविला आहे. हा या बँकांच्या बदलत्या धोरणांचा परिणाम आहे.

हे सुद्धा वाचा

वर्षभरातच 57 टक्क्यांहून अधिकचा फायदा रिपोर्टनुसार, या 12 सरकारी बँकांचा नफा गेल्यावर्षीपेक्षा, आर्थिक वर्ष 2021-22 च्या तुलनेत 57 टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या दरम्यान सर्व 12 सरकारी बँकांना मिळून 66,539.98 कोटी रुपयांचा फायदा झाला. आर्थिक वर्ष 2022-23 या काळात सरकारी बँकांच्या नफ्यामध्ये एसबीआयने मोठी भरारी घेतली. एसबीआयने 50 हजार कोटी रुपयांचा नफा कमविला.

या बँकांना झाला सर्वाधिक फायदा गेल्या आर्थिक वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा 59 टक्क्यांनी वाढून 50,232 कोटी रुपये झाला. तर सर्वांना चकित करत बँक ऑफ महाराष्ट्राने मोठी झेप घेतली. ही बँक जोरदार फायद्यात आली. महाबँकेने 126 टक्क्यांचा नफा कमविला. या बँकेने 2,602 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर युको बँकेचा क्रमांक आहे. या बँकेने 100 टक्के नफा कमवित 1,862 कोटी रुपये आणि बँक ऑफ बडोद्याने 94 टक्के तेजीसह 14,110 कोटी रुपयांचा नफा मिळविला.

पंजाब नॅशनल बँक पिछाडीवर गेल्या आर्थिक वर्षात केवळ पंजाब नॅशनल बँकेच्या नफ्यात घसरण आली. ही बँक सोडून इतर सर्व 11 सरकारी बँकांनी जोरदार नफा कमविला. पीएनबीचा शुद्ध लाभ आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 3,457 कोटी रुपये होता. त्यात 27 टक्के घसरण झाली. हा नफा 2,507 टक्क्यांवर येऊन ठेपला. आकडेवारीनुसार, 10,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक लाभ मिळविणाऱ्या सरकारी बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा (14,110 कोटी) आणि कॅनरा बँक (10,604 कोटी) यांचा सहभाग आहे.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.