Dal Price : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! यंदा डाळींच्या किंमती नाही होणार बेभाव, रामबाण ठरणार केंद्र सरकारचा हा उपाय
Dal Price : केंद्र सरकारच्या योजनेमुळे यंदा डाळीचे भाव गगनाला भिडणार नाहीत. त्यासाठी काय उपाय करण्यात आले आहेत?
नवी दिल्ली : देशातील महागाई (Inflation) नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने यंदा वर्ष सुरु होताच उपाय योजना केली आहे. या वर्षात डाळीच्या भावावरुन (Plus Rate) रान पेटणार नाही, याची काळजी केंद्र सरकारने अगोदरच घेतली आहे. त्यासाठी विविध उपाय योजना आखण्यात आल्या आहेत. देशात तूर डाळीचा (Tur Dal) साठा कमी होऊ नये यासाठी केंद्राने उपाय केल्या आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने 10 लाख टन तूर डाळ आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाफेड खुल्या बाजारात हरभरा डाळ (Chana Dal) स्वस्तात विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हरभरा डाळीच्या किंमती कमी ठेवण्यासाठी मदत मिळेल.
कृषी मंत्रालयाने याविषयीची आकडेवारी सादर केली. त्यानुसार, 2022-23 (जुलै-जून) या काळात डाळींचे उत्पादन किती झाले,याची माहिती दिली. मटारचे उत्पादन मागील वर्षातील 43.4 लाख टनांवरून 38.9 लाख टनांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
तूर डाळीचे उत्पादनात कर्नाटक अग्रेसर आहे. पण राज्यात अनेक ठिकाणी खराब हवामान आणि पीकांवरील रोगांमुळे तूर डाळीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसण्याची शक्यता होती.
देशात गेल्या सत्रात हरबरा डाळीचे चांगले उत्पादन झाले होते. नाफेडने गेल्या हंगामात एमएसपीवर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हरबरा खरेदी केली होती. पण नाफेड खुल्या बाजारातून ठोक खरेदीदारांसाठी निविदा प्रक्रिया 4700 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे.
नाफेडने हरबरा डाळ विक्री केल्याने बाजारात डाळीच्या किंमती 4,800-4,900 रुपये प्रति क्विंटल सुरु आहे. 2022-23 च्या हंगामात हरबरा डाळीचा भाव 5,335 रुपये प्रति क्विंटल होता. यंदा डाळीच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र कसोशिने प्रयत्न करत आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर 2022 मध्ये भारताने 2 लाख टन तूर डाळ आयात केली. भारत आफ्रिकी देश आणि म्यानमारमधून सर्वाधिक तूर डाळ आयात करतो. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताने एकूण 7.6 लाख टन तूरडाळ आयात केली होती.