अलर्ट! ‘या’ सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर सावधान, ‘हे’ नवे नियम माहिती नसतील तर येणार मोठ्या अडचणी
बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेने नवे नियम जारी केले आहेत. (punjab national bank bank of baroda ifsc cheque book)
मुंबई : देशातील अनेक मोठ्या बँकांचे विलिनीकरण झाल्यामुळे बँकिंग क्षेत्रातील नियमांमध्येसुद्धा मोठे बदल झाले आहेत. बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेने नवे नियम जारी केले आहेत. त्यामुळे बदललेल्या नियमांमुळे सामान्यांच्या जीवनावर काय परिणाम पडणार, याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. (punjab national bank bank of baroda new law of ifsc cheque book)
आगामी काही दिवसांत बँकिंग क्षेत्रात अनेक मोठे बदल होणार आहेत. विशेषत: बँक ऑफ बड़ोदा (Bank of Baroda) आणि पंजाब नॅशनल बँकने (PNB-Punjab National Bank) आपले नवे नियम जारी केले आहेत. पंजाब नॅशनल बँकेने ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि यूनियन बँक ऑफ इंडिया (UBI) या बँकेचे जुने चेक तसेच या बँकांचे IFSC/MICR कोड 31 मार्च 2021 नंतर चालणार नसल्याचं म्हटंलय. तसेच बँक ऑफ बडोदानेसुद्धा ई-विजया आणि ई-देना या बँकांचे जुने आईएफएससी (IFSC) कोड 1 मार्च 2021 पासून बंद होणार असल्याचं म्हटलेलं आहे.
बँकेचे आयएफएससी कोड कसे मिळवावे
विजया आणि देना बँकेचे आयएफएससी कोड 1 मार्चपासून चालणार नसले तरी, बँक ऑफ बडोदाने नवे आयएफएससी कोड मिळवण्यासाठी ग्राहकांना पर्याय उपलब्ध करुन दिलेला आहे. ग्राहकांना नवा आयएफएससी कोड हवा असेल तर बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तो मिळवता येऊ शकतो. तसेच, 18002581700 या टोल फ्री नंबरुनसुद्धा आयएफएससी कोड मिळवता येईल. बँक ऑफ बडोदा बँकेने आयएफएससी कोड मिळवण्यासाठी 8422009988 हा नंबरुसुद्धा जारी केला आहे. या नंबरवर फोन केल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या बँकेचे नवे आयएफएससी कोड मिळतील.
जुने आयएफएससी कोड वापरल्यास काय होणार?
Dear customers, please make a note that the e-Vijaya and e-Dena IFSC Codes are going to be discontinued from 1st March 2021. It’s easy to obtain the new IFSC codes of the e- Vijaya and Dena branches. Simply follow the steps and experience convenience. pic.twitter.com/SgqrzwHf6e
— Bank of Baroda (@bankofbaroda) February 4, 2021
देना आणि विजया या दोन बँका बँक ऑफ बडोदा या बँकेत विलीन करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे विजया आणि देना बँकेचे आयएफएससी कोड 1 मार्चपासून बंद होणार आहेत. 1 मार्चपासून जुने आयएफएससी कोड वापरून ऑनलाईन व्यवहार करण्याचा प्रयत्न केला तर पैसै ट्रान्सफर होऊ शकणार नाहीत. बँक ऑफ बडोदा ही देशातील सर्वात मोठी तिसरी सरकारी बँक आहे.
पंजाब नॅशनल बँकेनेही नियम बदलले
दरम्यान, पंजाब बँकेनेही आपल्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या सहकारी बँका ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि यूनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे जुने चेकबुक तसेच आयएफएससी, एमआयसीआर कोड यामध्ये बदल केले केले आहेत. पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि यूनायटेड बँक ऑफ इंडिया या दोन बँकांचे विलीनीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे या बँकांचे जुने चेकबुक तसेच आयएफएससी कोड 31 मार्चपर्यंतच काम करतील. नवे आयएफएससी कोड घेण्याची व्यवस्था पंजाब नॅशनल बँकेनेही करुन दिलेली आहे.
इतर बातम्या :
SBI मध्ये खातं असेल तर तुम्हालाही स्वस्तात पेट्रोल मिळू शकतं!
Gold Price Outlook | मार्च महिन्यात सोनं 50 हजारांचा टप्पा गाठणार? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…