Paytm ला केला रामराम अन् इकडे नशीबाने ठोकला की सलाम, श्रीमंतीने पायाशी घेतले लोळण

पेटीएमच्या जहाजाला मोठं भगदाड पडताच, काही कर्मचाऱ्यांनी स्वतःहून रामराम ठोकला तर काहींना कंपनीने अखेरचा जय महाराष्ट्र केला. काही कर्मचाऱ्यांनी पेटीएमलाच रोल मॉडेल मानून स्वतःचा स्टार्टअप सुरु केला. एकूण 22 स्टार्टअप्स सुरु झाले. बाजारात त्यांची किंमत आज 10 हजार कोटींहून अधिक आहे. या कर्मचाऱ्यांचे नशीब असे फळफळले.

Paytm ला केला रामराम अन् इकडे नशीबाने ठोकला की सलाम, श्रीमंतीने पायाशी घेतले लोळण
पेटीएमला केला रामराम, नशीबाने ठोकला सलाम Image Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 3:00 PM

देशातील दिग्गज फिनटेक कंपनी पेटीएमने (Paytm) देशात स्टार्टअपची संकल्पना रुजवलीच नाही तर ती जागवली. पेटीएमपासून प्रेरणा घेऊन देशात नंतर अनेक स्टार्टअप सुरु झाले. काही युनिकॉर्न झाले. पण पेटीएम ही अनेकांसाठी ट्रेनिंग स्कूल ठरली. सध्या पेटीएमवर संकटांचे ढग आहे. पेटीएमच्या जहाजाला भगदाड पडले असले तरी कंपनी सावरण्याचा प्रयत्न करत आहे. नोटबंदीच्या काळात पेटीएम दैनंदिन व्यवहारातील लोकांचा सच्चा मित्र ठरला होता. ही आयडियाची कल्पना पाहून इतर अनेक भिडू युपीआयच्या बाजारात उतरले. पेटीएमच्या प्रेरणेतून कर्मचाऱ्यांनी एक दोन नव्हे तर देशात 22 स्टार्टअप सुरु केले. माजी कर्मचाऱ्यांनी ही एकप्रकारे पेटीएमला कामाची पावतीच दिली आहे. या सर्व स्टार्टअप्सचे बाजारातील एकूण मूल्य जवळपास 10,668 कोटी रुपये आहे.

पॉकेट एफएम आणि इंडियागोल्ड सारख्या कंपन्या

प्रायव्हेट सर्किलच्या वृत्तानुसार, 2018 मध्ये पहिल्यांदा स्टार्टअप्सची लाट आली. त्यावेळी पेटीएमने 300 कोटी रुपयांचा ईसोप बायबॅक (ESOP Buyback) केल. या स्टार्टअपमध्ये पेटीएमचे माजी प्रोडक्ट मॅनेजर रोहन नायक यांचे पॉकेट एफएम (Pocket FM), पेटीएम वॉलेटचे पूर्व बिझनेस हेड अमित लखोटिया यांचे पार्क प्लस (Park+) आणि पेटीएमचे माजी एसव्हीपी प्रोडक्ट दीपक एबट आणि पेटीएम पोस्टपेडचे पूर्व बिझनेस हेड नितीन मिश्रा यांची सुवर्ण कर्ज देणारी कंपनी इंडियागोल्ड (Indiagold) यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

अनेक क्षेत्रात पसरले स्टार्टअप

याशिवाय विद्यार्थ्यांसाठी डिजिटल पॉकेट मनी प्लॅटपॉर्म जुनियो (Junio), ऑडियो डेटिंग प्लेटफॉर्म एफआरएन (Frn), चष्मासाठीचा ब्रँड क्लियरदेख (Cleardekh), ज्येष्ठ नागरिकांसाठीचा ऑनलाईन क्लब जेनवाईज क्लब (Genwise Club), फुटवेअर कंपनी योहो (Yoho), वेंडिंग मशीन कंपनी दालचीनी (Daalchini) आणि सायबर सिक्युरिटी स्टार्टअप कृतिकल टेक (Kratikal Tech) यांचा समावेश आहे.

फ्लिपकार्ट पण प्रेरणास्त्रोत

या अहवालानुसार, देशात यावेळी एकूण 24 टक्के स्टार्टअप्स फिनटेक आहेत. यानंतर ईकॉमर्स, मीडिया आणि इंटरटेनमेंट, सॉफ्टवेअर स्टार्टअप्सचा क्रमांक लागतो. या स्टार्टअप्सने देशात जवळपास 2,500 रोजगार निर्माण केले. स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्याचे श्रेय पेटीएमला जाते. याशिवाय फ्लिपकार्ट पण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. फ्लिपकार्ट (Flipkart) पण देशात स्टार्टअप देण्यात सर्वात पुढे आहे. फ्लिपकार्टने देशात जवळपास 24.6 अब्ज डॉलर बाजार मूल्य असलेल्या कंपन्या दिलेल्या आहेत. यामध्ये फोनपे (PhonePe), ग्रो (Groww), उडान (Udaan), स्पिनी (Spinny), कल्ट फिट (cult.fit), स्लाइस (Slice), नावी (Navi), क्योरफूड्स (Curefoods), क्रेडजेनिक्स (Credgenics) आणि ओके क्रेडिट (OkCredit) यांचा समावेश आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.