राहुल गांधी यांच्याकडे अदानी, अंबानी यांच्या कंपन्यांचे शेअर किती?; सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या शेअरमध्ये?
Rahul Gandhi : काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी गेल्या काही वर्षांपासून लोकसभा निवडणूक 2024 साठी अवघा देश पिंजून काढला आहे. 3 एप्रिल रोजी त्यांनी केरळमधील वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानुसार, त्यांनी 25 शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. किती आहे त्यांच्याकडे संपत्ती?
दोन वर्षांत राहुल गांधी यांनी देश पिंजून काढला. त्यांच्या दोन यात्रा या इतिहासात दखलपात्र ठरल्या. लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी त्यांनी घेतलेली मशागत कितपत योग्य होती हे येणारा काळ ठरवेल. राहुल गांधी यांनी 3 एप्रिल रोजी केरळमधील वायनाड येथून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत राहुल गांधी यांनी त्यांच्या उत्पनाची जंत्री जोडली. सोबतच्या शपथपत्रात त्यांनी शेअर, सुवर्णरोखे आणि म्युच्युअलं फंडमधील गुंतवणुकीचा खुलासा केला आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या पोर्टफोलिओत 25 शेअर आहेत. त्यामध्ये त्यांनी 4.30 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
रिलायन्स, अदानीचे शेअर किती?
- राहुल गांधी यांनी टाटा कंपनींपासून ते ICICI बँक आणि काही लार्ज कॅप शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. याशिवाय त्यांनी काही स्मॉल कॅप फंडमध्ये पण पैसा गुंतविला आहे. राहुल गांधी यांच्याकडे सुप्रजीतमध्ये 4,068 शेअर होते. त्यांची एकूण किंमत 16.65 लाख रुपयांहून अधिक होती.
- राहुल गांधी यांच्याकडे ITC चे 3,039 शेअर आणि आयसीआयसीआय बँकेचे 2,299 शेअर होते. त्यांचे बाजारातील मूल्य अनुक्रमे 12.96 लाख रुपये आणि 24.83 लाख रुपये होते. त्यांच्या पोर्टफोलिओत, अल्काईल एमाईन्स, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, दीपक नायट्रेट, डिव्हीज लॅबोरेटरीज, इन्फोसिस, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेज, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि टायटन कंपनीचे स्टॉक आहेत. पण राहुल गांधी यांच्या पोर्टफोलिओत अदानी आणि अंबानी समूहातील एकाही कंपनीचा स्टॉक नाही.
- मार्केट व्हॅल्यू टर्मनुसार, पिडीलाईट इंडस्ट्रीजमध्ये त्यांनी सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. त्यानंतर त्यांनी बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्समध्ये गुंतवणूक केली आहे. पिडीलाईटमध्ये त्यांच्या 1,474 शेअरचे किंमत 15 मार्च रोजीपर्यंत 43.27 लाख रुपये होती. बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्समध्ये त्यांच्याकडे 551 शेअर आणि 1,231 शेअरचे मूल्य क्रमशः 35.89 लाख रुपये तर 35.29 लाख रुपये होते.
म्युच्युअल फंडात किती गुंतवणूक
राहुल गांधी यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे 55,000 रुपयांची रोख आहे. तर दोन बचत खात्यात 26.25 लाख रुपयांची ठेव आहे. SBI, HDFC बँक आणि सात म्युच्युअल फंड योजनेत 3.81 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांनी HDFC AMC, PPFAS ICICI Prudential AMC मध्ये विशेष गुंतवणूक केली आहे. टपाल खाते, एनएसएस, दागदागिने यासह राहुल गांधी यांची एकूण गुंतवणूक 9.24 कोटी रुपये आहे.
येथे पण गुंतवणूक
- सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत (SGB) 15.27 लाखांची गुंतवणूक
- पीपीएफमध्ये त्यांनी एकूण 61.52 रुपये गुंतवले आहेत
- त्यांच्याकडे 333.30 ग्रॅम सोने आहे, त्याची किंमत 4.20 लाख रुपये