Rahul Gandhi : दर महिन्याला इतक्या लाखांहून अधिकची छपाई, मोदी 3.0 मध्ये राहुल गांधी यांची कमाई

| Updated on: Aug 13, 2024 | 5:00 PM

Rahul Gandhi Portfolio : राहुल गांधी यांना शेअर बाजारातून जोरदार कमाई होत आहे. त्यांच्याकडे जवळपास 24 कंपन्यांचे शेअर आहेत. त्यातील 20 कंपन्या फायद्यात आहेत. तर 4 कंपन्यांना मोठे नुकसान झाले आहे. गेल्या पाच महिन्यांत त्यांना जबरदस्त नफा झाला आहे.

Rahul Gandhi : दर महिन्याला इतक्या लाखांहून अधिकची छपाई, मोदी 3.0 मध्ये राहुल गांधी यांची कमाई
राहुल गांधी यांची जोरदार कमाई
Follow us on

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या शेअर बाजारामुळे मालामाल झाले आहेत. शेअर बाजारातील अनेक कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी याविषयीची माहिती दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक धोरणांचे ते कट्टर विरोधक आहेत. पण मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात राहुल गांधी यांना मोठा फायदा झाला आहे. दर महिन्याला ते 9 लाख रुपयांपेक्षा अधिकची कमाई करत आहेत. गेल्या पाच महिन्यात राहुल गांधी यांना त्यांच्या पोर्टफोलिओतून 46.49 लाख रुपयांहून अधिकची कमाई झाली आहे.

24 स्टॉकपैकी 4 शेअर पिछाडीवर

मीडियातील वृत्तानुसार, 15 मार्च, 2024 रोजी राहुल गांधी यांचा पोर्टफोलिओ 4.33 कोटी रुपयांचा होता. हा आकडा 12 ऑगस्ट रोजी 4.80 कोटी रुपयांच्या घरात पोहचला. राहुल गांधी यांच्याकडे एशियन पेंट्स, बजाज पेंट्स, बजाज फायनान्स, दीपक नायट्रेट, डिवीज लॅब्स, जीएमएम फोडलर, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, आयटीसी, टीसीएस, टायटन, ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स ऑफ इंडिया आणि एलटीआय माईंडट्रीसह 24 शेअर आहेत. यातील एलटीआय माईंडट्री, टिसीएस, टायटन आणि नेस्ले इंडिया हे शेअर पिछाडीवर आहेत.

हे सुद्धा वाचा

या छोट्या कंपन्यांचे शेअर पण चर्चेत

राहुल गांधी यांच्या पोर्टफोलिओत अनेक छोट्या कंपन्यांचे शेअर पण आहेत. यामध्ये वेर्टोज ॲडव्हरटाईजिंग, विनायल केमिकल या कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये वेर्टोज ॲडव्हरटाईजिंग अधिक लोकप्रिय आहे. राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे 260 शेअर होते. पण आता स्टॉक स्प्लिट आणि बोनस यामुळे त्यांच्याकडे 5200 शेअर झाले आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन कीर्तिमान केला आहे. शनिवारी हिंडनबर्ग रिपोर्ट आला. पण त्याचा शेअर बाजारावर मोठा परिणाम दिसला नाही. गेल्यावेळी भारतीय शेअर बाजाराने गंटगळ्या खाल्ल्या होत्या. आता तसे वातावरण दिसत नाही.

हिंडनबर्गच्या आरोपांची करा चौकशी

राहुल गांधी यांनी हिंडनबर्ग कंपनीने केलेल्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अमेरिकन शॉर्टसेलर हिंडनबर्गने सेबी (SEBI) प्रमुख माधवी पुरी बूच यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्याला अर्थातच गौतम अदानी यांच्याशी संबंधित किनार आहे. अदानींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा या रिपोर्टचा दावा आहे. पण या आरोपांचा यावेळी भारतीय शेअर बाजारावर कोणताही मोठा परिणाम दिसून आला नाही. अदानी समूह, माधवी पुरी बूचने हे आरोप फेटाळले आहेत.