Indian Railway : परताव्यात तर हा शेअर ठरला शक्तीमान, आता फायद्यात राहतील गुंतवणूकदार

Indian Railway : 27 मार्च 2020 रोजी भारत सरकारचा उपक्रम असलेल्या या रेल्वे कंपनीचा शेअर अगदी स्वस्त होता. म्हणजे 13 रुपयांपेक्षा पण स्वस्त होता. या तीन वर्षांत हा स्टॉक 169 रुपयांवर पोहचला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना आतापर्यंत 1300 टक्के परतावा दिला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

Indian Railway : परताव्यात तर हा शेअर ठरला शक्तीमान, आता फायद्यात राहतील गुंतवणूकदार
Follow us
| Updated on: Oct 01, 2023 | 3:31 PM

नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : शुक्रवारी शेअर बाजारात (Share Market) तेजीत होता. काही दिवसांपासून पडझड सुरु असताना गुंतवणूकदारांना शुक्रवार पावला. भारत सरकारचा उपक्रम असलेल्या या सरकारी कंपनीचा (Government Enterprises Share Company) हा शेअर आतापर्यंत सूसाट धावला. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात हा शेअर जवळपास 2 टक्क्यांनी वधारला. हा शेअर 169.30 रुपयांच्या स्तरावर पोहचला. गेल्या एका महिन्यात हा शेअर 22 टक्क्यांनी पळाला. एका महिन्यापूर्वी हा शेअर 138 रुपयांवर होता. त्याने गुंतवणूकदारांना तुफान रिटर्न दिले आहेत. 27 मार्च 2020 रोजी या शेअरची किंमत 13 रुपयांहून ही कमी होती. आता स्टॉक 169 रुपयांवर पोहचला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना आतापर्यंत 1300 टक्के परतावा दिला आहे.

असा तगडा परतावा

तर या रेल्वेशी संबंधित कंपनीने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. एक महिन्यापूर्वी हा शेअर 138 रुपयांवर होता. या शेअरने 22 टक्के मल्टिबॅगर रिटर्न दिले आहेत. तर गेल्या 6 महिन्यात हा शेअर 77 रुपयांवरुन 169 रुपयांवर पोहचला आहे. त्याने या कालावधीत 125 टक्क्यांचा बम्पर रिटर्न दिला आहे. एका वर्षापूर्वी हा शेअर 36 रुपयांच्या आसापास होता. त्या हिशोबाने या शेअरने एका वर्षांत 372 टक्के परतावा दिला आहे. तर पाच वर्षांचा लेखाजोखा पाहता, या शेअरने 757 टक्क्यांचा परतावा दिला आहे. हा शेअर 26 रुपयांवर होता. हा शेअर मल्टिबॅगर ठरला आहे.

हे सुद्धा वाचा

कोणता आहे हा स्टॉक

सार्वजनिक उपक्रमातील कंपनी (PSU) रेल विकास निगम लिमिटेडने (Rail Vikas Nigam Ltd) हा परतावा दिला आहे. ही कंपनी बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहे. या कंपनीला आता हिमाचल प्रदेश स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाने 1097 कोटी रुपयांची वर्कऑर्डर दिली आहे. या राज्यातील दक्षिण भागात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कंपनीला कंत्राट मिळाले आहे.

यापूर्वी पण ऑर्डर

यापूर्वी या रेल्वे कंपनीला सेंट्रल रेल्वेकडून चार बोगदे तयार करण्याचे काम मिळाले आहे. हे काम जवळपास 311 कोटी रुपयांचे आहे. RVNL ही ऑर्डर 18 महिन्यात पूर्ण करायची आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेड ही नवरत्न कंपनी आहे. ही कंपनी केंद्र सरकारने 2003 मध्ये स्थापन केली होती. ही कंपनी रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.