Railway Share | नवरत्न होताच सूसाट धावला शेअर, रेल्वेच्या या दोन कंपन्यांची आली मौज

Railway Share | देशात दोन रेल्वे कंपन्यांना नवरत्न कंपन्यांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानंतर शेअर बाजारात या कंपन्यांचे शेअर रॉकेट सारखे उडाले. या कंपन्यांचे मार्केट कॅप अब्जावधी रुपयांनी वधारले. या दोन कंपन्या कोणत्या आहेत. त्यांची कामगिरी कशी आहे. गुंतवणूकदारांना या कंपन्यांनी कसा फायदा मिळवून दिला?

Railway Share | नवरत्न होताच सूसाट धावला शेअर, रेल्वेच्या या दोन कंपन्यांची आली मौज
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 7:22 PM

नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : रेल्वे कंपन्यांसाठी सध्या सुगीचा हंगाम सुरु आहे. केंद्र सरकार रेल्वे सुधारणांसाठी मोठे काम करत आहे. रेल्वे बजेट बंद केले असले तरी रेल्वे विकास प्रकल्प जोमात आहे. अनेक मॉडेल रेल्वे स्टेशन आकार घेत आहे. रुळ बदलण्याचे काम सुरु आहे. देशातील हजारो रेल्वे स्टेशनचे रुपडे पालटणार आहे. विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. दोन रेल्वे कंपन्यांना नवरत्नचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामध्ये एक कंपनी इरकॉन आहे तर दुसऱ्या कंपनीचे नाव राईट्स आहे. शुक्रवारी बाजारात हे वृत्त दाखल होताच दोन्ही कंपन्यांचे शेअर सूसाट धावले. गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. तर कंपनीच्या मार्केटमध्ये मोठी वाढ झाली.

IRCON च्या शेअरमध्ये 10 टक्के वाढ

देशातील प्रमुख रेल्वे कंपनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडचा शेअर आज 10 टक्क्यांनी वधारला. बीएसईवरील आकड्यांनुसार, कंपनीचा शेअर 13.90 रुपयांनी वधारला. हा शेअर तेजीसह 149.75 रुपयांवर बंद झाला. हा शेअर व्यावसायिक सत्रात 154.70 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला. एका दिवसापूर्वी कंपनीचा शेअर 135.85 रुपयांवर बंद झाला होता. येत्या काही दिवसांत हा शेअर मोठी झेप घेईल असा तज्ज्ञांचा दावा आहे.

हे सुद्धा वाचा

इरकॉनला 1300 कोटींचा फायदा

इरकॉन कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजीचे सत्र आले. त्यामुळे इरकॉन इंटरनॅशनलच्या मार्केट कॅपमध्ये 1300 कोटींपेक्षा अधिकचा फायदा झाला. आकड्यानुसार, एक दिवस अगोदर बाजार बंद होताना कंपनीचे मार्केट कॅप 12,776.90 कोटी रुपये होते. तर बाजार बंद होताना कंपनीचे मार्केट कॅप 14,084.22 कोटी रुपये होते. कंपनीच्या महसूलात 1,307.32 कोटी रुपयांची वाढ झाली.

RITES कंपनी सूसाट

राईट्स कंपनीला पण सरकराने नवरत्नचा दर्जा दिला. त्यामुळे कंपनीला त्याचा मोठा फायदा झाला. राईट्सच्या शेअरमध्ये आज 5.44 टक्क्यांची तेजी दिसून आली. हा शेअर 25.75 रुपयांच्या तेजीसह 499.20 रुपयांवर बंद झाला. आजच्या व्यावसायिक सत्रात हा शेअर 506.45 रुपयांपर्यंत उसळला होता. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 600 कोटींहून अधिकची वाढ दिसून आली.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.