Rakesh Jhunjhunwala : हीच गुंतवणूक झाली तोट्याची! राकेश झुनझुनवाला यांचा हाच चुकला अंदाज
Rakesh Jhunjhunwala : भारताचे दिग्गज गुंतवणूकदार, राकेश झुनझुनवाला यांना अनेक गुंतवणूकदार फॉलो करतात. त्यांना जाऊन एक वर्षे झाली तरी त्यांच्या दुरदृष्टीवर, त्यांच्या स्टॉकवर चर्चा झडतेच. त्यांच्या एका मुलाखतीची अशीच एक आठवण सोशल मीडियावर फिरत आहे, त्यात त्यांनी त्यांची सर्वात वाईट गुंतवणूक कोणती याचा उलगडा केला आहे.
मुंबई | 7 ऑक्टोबर 2023 : ‘शेअर बाजारात कोणीच राजा (Share Market King) नसतो.’ हे अजरामर वाक्य शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या हृदयावर कायमचे कोरले गेले आहे. भारताचे बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचे हे वाक्य आहे. त्यांचे अनेक विचार गुंतवणूकदारांच्या मनावर कोरल्या गेले आहेत. राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात निधन झाले. पण त्यांचा एकूणच प्रवास सर्वांनाच आजही प्रेरणादायी आहे. अनेक जण त्यांच्या गुंतवणुकीचा अभ्यास करतात. त्यांनी दिलेल्या सल्ल्यांचे पारायण करतात. पण त्यांना एका गोष्टीची कायम खंत होती. आयुष्यातील ही सर्वात वाईट गुंतवणूक ठरल्याचे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. सोशल मीडियावर ही मुलाखत पुन्हा व्हायरल झाली आहे. कोणती होती त्यांची सर्वात वाईट गुंतवणूक? कुठे चुकला त्यांचा अंदाज?
5,000 रुपयांपासून झाली होती सुरुवात
राकेश झुनझुनवाला यांनी मातीला जरी स्पर्श केला तरी तीचं सोनं होईल, असे वाक्य शेअर बाजारात कायम बोलले जायचे. इतका त्यांच्याविषयी लोकांना भरवसा होता. राकेश झुनझुनवाला यांनी 36 वर्षांपूर्वी गुंतवणुकीचा प्रवास सुरू केला. अवघ्या 5,000 रुपयांसह, सुरु झालेला हा प्रवास 21 हजार कोटींहून अधिक आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर, गुंतवणूकीवर, नियोजनावर गुंतवणूकदारांची बारीक नजर असायची.
This post is being widely shared. At the last stage of his life Rakesh gave the most valuable and profitable investment advice ever. It’s advice that is worth billions and the best part is, it requires investing your time, not your money. #SundayThoughts pic.twitter.com/s1tXX5UTGQ
— anand mahindra (@anandmahindra) August 21, 2022
लंबी रेस का घोडा ओळखायचे
स्टॉक्स निवडताना ते चोखंदळ होते. जो स्टॉक इतरांच्या नजरेतून सुटला, ते चटकन हेरायचे आणि त्यात गुंतवणूक यशस्वी ठरायची. ते गेल्यानंतर ही त्यांनी निवडलेले स्टॉक अजूनही जोरदार परतावा देत आहेत. राकेश झुनझुनवाला यांना शेअर बाजारात गुंतवणुकीचा 40 वर्षांहून अधिक अनुभव होता. गुंतवणूकदारांनी त्याच्या टिप्स पाळल्या. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी शेअर बाजारात प्रवेश केला होता.
दिलखुलास उत्तरे
प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे पण राकेश झुनझुनवाला यांच्या आठवणीत रमले. त्यांना एक मोलाचा किस्सा आठवला. त्यांनी तो गेल्यावर्षी शेअर केला होता. राकेश झुनझुनवाला यांना त्यांच्या गुंतवणुकीविषयी अनेकजण प्रश्न विचारत असत आणि ते दिलखुलासपणे त्याची उत्तरे देत असत. त्यांना सर्वात चांगली गुंतवणूक कोणती होती असा प्रश्न विचारण्यात आला होता.
हा सल्ला बांधा गाठीशी
राकेश झुनझुनवाला यांनी सर्वांसाठी मोलाचा सल्ला दिला होता. त्यांच्यानुसार शेअर बाजारात गुंतवणूक करणे, पैसा कमवणे ही दुय्यम बाब आहे. पण खरी गुंतवणूक कशात आहे हे त्यांनी सांगितले. ‘माझी सर्वात वाईट गुंतवणूक हे माझं आरोग्य होतं. मी सर्वांना सांगेल की, त्यांनी आरोग्याकडं लक्ष देणे गरजेचे आहे. तीच खरी गुंतवणूक आहे.’ या त्यांच्या वाक्यानं अनेकांच्या मनात घरं केलं. पैसा तर मिळेलच पण आरोग्य बिघडले तर ते कमावणे अवघड असते, जणू हाच संदेश त्यांनी दिला.