रक्षाबंधन आता एकदम जवळ आले आहे. आता सणांची मालिका सुरू होईल. एकानंतर एक सण येतील. बाजारात चारही दिशांना आनंदाची लहर असेल. रक्षा बंधनाच्या दिवशी भाऊराया लाडक्या बहिणीला काही ना काही भेट वस्तू देतो. जर तुम्ही पण या रक्षाबंधनाला काही गिफ्ट देण्याच्या विचारात असाल तर बहिणीला अगोदर आर्थिक सक्षम करा. तिच्या सुखी भविष्यासाठी या गुंतवणूक योजना चांगला पर्याय ठरू शकतील.
1. बचत खाते द्या उघडून
सध्या कोणत्या ना कोणत्या कारणासाठी बँक खाते आवश्यक झाले आहे. जर तुमच्या बहिणीचे कोणत्याही बँकेत खाते नसेल तर या रक्षाबंधनाला तिचे एखाद्या बँकेत खाते उघडे करा. त्यात तुम्ही एखादी आरडी अथवा एफडी तिच्या नावे सुरु करु शकता. तिला व्यवहारासाठी एक एटीएम कार्ड पण मिळेल. तसेच स्मार्टफोन युपीआयला हे खाते जोडता येईल.
2. स्टॉकमध्ये करा गुंतवणूक
या रक्षा बंधनाला बहिणीच्या नावे डीमॅट खाते उघडा. तिच्या नावे योग्य शेअर खरेदी करा. दरमहिन्याला काही शेअर तिच्या खात्यात जमा करण्याची तरतूद करा. त्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या. त्यानंतर अशा प्रकारची गुंतवणूक करा.
3. मुदत ठेव योजनेत रक्कम गुंतवा
जर बहिणीच्या शिक्षणासाठी अथवा लग्नासाठी पैसे जमा करायचे असेल तर एखादी मुदत ठेव योजनेत तिच्या नावे पैसे गुंतवा. कोणत्याही बँकेत तिच्या नावे मुदत ठेव योजनेत रक्कम गुंतवा. त्यामुळे तिला एका ठराविक वेळेत मोठी रक्कम मिळू शकते.
4. म्युच्युअल फंडात करा गुंतवणूक
सध्या म्युच्युअल फंड हा पण गुंतवणुकीचा एका चांगला पर्याय ठरत आहे. जर तुम्ही मोठी रक्कम गुंतवू इच्छित नसाल तर बहिणीच्या नावे म्युच्युअल फंडमध्ये एक ठराविक रक्कम गुंतवणूक करा. अथवा एकरक्कमी गुंतवणूक करा. भविष्यात तिच्यासाठी ही गुंतवणूक फायदेशीर ठरेल. त्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या.
5. सोने-चांदीतील गुंतवणूक
सोने आणि चांदी खरेदी ही भारतीय यांची परंपरा आहे. इतर ठिकाणी गुंतवणूक करायची नसेल तर बहिणीला सोने अथवा चांदीचे नाणे गिफ्ट द्या. तिच्यासाठी अंगठी अथवा एखादा दागिना खरेदी करा. अथवा गोल्ड बाँड, ईटीएफ आणि इतर गुंतवणूक पर्याय पण आहेत.