Ramdev Baba : हा नव्हे योगायोग; रामदेव बाबांच्या या कंपनीवर गुंतवणूकदार लट्टू, शेअरची तुफान खरेदी

Share Market : बाबा रामदेव यांच्या या कंपनीच्या शेअरवर सध्या गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते हा शेअर 1700 रुपयांचा टप्पा ओलांडेल. मध्यंतरी कोर्टाने फटकारल्यानंतर माफीनामा लिहून द्यावा लागला होता.

Ramdev Baba : हा नव्हे योगायोग; रामदेव बाबांच्या या कंपनीवर गुंतवणूकदार लट्टू, शेअरची तुफान खरेदी
कमाईचा मोका
Follow us
| Updated on: Jun 30, 2024 | 4:49 PM

शेअर बाजार सध्या तेजीत आहे. शुक्रवारी बाजारात लाभाचे पान पदरात पाडण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांनी आटापिटा केला. या दरम्यान योगगुरु रामदेव बाबा यांची कंपनी पतंजली फुड्सच्या शेअरमध्ये जोरदार मागणी नोंदविल्या गेली. आठवड्याच्या अखेरच्या सत्रात पंतजली फुड्सच्या शेअरमध्ये 6 टक्क्यांची उसळी दिसून आली. व्यापारी दिवसाच्या अखेरीस हा शेअर 1591.35 रुपयांवर बंद झाला. गुरुवारी हा शेअर 1515.35 रुपयांवर बंद झाला होता. तर एकाच दिवसात त्याने 5.02 टक्क्यांची उसळी घेतली. हा शेअर अजून मोठी घौडदौड करेल असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटत आहे.

तज्ज्ञांचे मत काय?

ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, पतंजली फुड्सचा शेअर 1790 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. पुढील तीन महिन्यांसाठी तज्ज्ञांनी टार्गेट प्राईससह स्टॉप लॉस पण दिला आहे. तज्ज्ञांनी 1446 हा स्टॉप लॉस दिला आहे. 16 फेब्रुवारी 2024 रोजी पतंजलीच्या शेअरची किंमत 1741 रुपयांपर्यंत गेली होती. हा या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक होता. तर जुलै 2023 मध्ये या शेअरची किंमत 1,164 रुपयांच्या निच्चांकीस्तरावर होता. हा या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक होता.

हे सुद्धा वाचा

मार्च महिन्यात नफ्यात घट

मार्च तिमाहीत पतंजली फुड्सच्या निव्वळ नफ्यात 22 टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत पतंजलीला 263.71 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या तिमाहीत नफ्याचा आकडा 206.32 कोटी रुपयांपर्यंत घसरला. तर महसूलात 4 टक्क्यांची वाढ होऊन हा आकडा 8,221 कोटी रुपयांवर आला.

कंपनीची योजना काय?

कंपनी आता नॉन फुड पोर्टफोलिओत वृद्धी करण्याची कसरत करत आहे. त्यासाठी संचालक मंडळाच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. अर्थात नेमकं काय करणार याविषयी काही समोर आलेले नाही. पण कंपनी खाद्य उत्पादनासोबतच इतर उत्पादनात उडी घेणार हे नक्की आहे. त्यासाठी पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात येत आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.