Celebrity : रणवीर सिंह, विराट कोहली याच्या पुढे, Allu Arjun पण नाही मागे, चकीत करतील कमाईचे आकडे

Celebrity : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह 181.7 दशलक्ष डॉलर च्या ब्रँड व्हॅल्यूसह भारतातील सर्वात मूल्यवान स्टार ठरला आहे. तर सर्वात व्हॅल्यूएबल महिला सेलिब्रिटीचा खिताब मिळवला आहे आलिया भट्ट हिने.

Celebrity : रणवीर सिंह, विराट कोहली याच्या पुढे, Allu Arjun पण नाही मागे, चकीत करतील कमाईचे आकडे
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 5:42 PM

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने केवळ अभिनयाची छाप सोडली नाही तर ब्रँड म्हणून त्याची ओळख बनविण्यात तो यशस्वी ठरला आहे. त्याचा फॅशन सेंस नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून चर्चेत राहण्याचे कसब रणवीरकडे आहे. आता त्याच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. क्रोलच्या एका अहवालानुसार, 2022 मध्ये रणवीर सिंह हा भारताचा सर्वात मूल्यवान सेलिब्रिटी (Most Valued Celebrity) ठरला आहे. त्याने मोस्ट आयकॉनी विराट कोहलीला (Virat Kohli) या यादीत धोबीपछाड दिली आहे. त्याला मागे सारत रणवीर पुढे सरसावला आहे. तर सर्वात व्हॅल्यूएबल महिला सेलिब्रिटीचा खिताब आलिया भट्ट हिने मिळवला आहे.

कॉर्पोरेट इन्व्हेस्टिंगेशन अथवा रिस्क कन्सल्टिंग फर्म क्रोलने (Kroll Report) याविषयीचा अहवाल दिला. त्यानुसार, देशातील सर्वात श्रीमंत सेलेब्रिटींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने पहिला क्रमांक पटकावला आहे. रणवीर सिंह याने 181.7 दशलक्ष डॉलरच्या ब्रँड व्हॅल्यूसह (Brand Value) 2022 मध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला. तर सर्वात व्हॅल्यूएबल महिला सेलिब्रिटीचा खिताब आलिया भट्ट हिने मिळवला आहे. तिची ब्रँड व्हॅल्यू 102.9 दशलक्ष डॉलर आहे.

पाच वर्षे हा गबरु टॉपवर

हे सुद्धा वाचा

गेल्या पाच वर्षांपासून विराट कोहली सातत्याने पहिल्या क्रमांकावर होता. तो देशातील सर्वात व्हॅल्युएबल सेलिब्रिटी होता. पण रणवीर सिंह याने हा मुकूट हिसकावला. तर कोहली आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचला. सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्ट 2022 : बियाँड द मेनस्ट्रीम या ताज्या अहवालात याविषयीचा दावा करण्यात आला. त्यामध्ये कोहलीची ब्रँड व्हॅल्यू 176.9 दशलक्ष डॉलर आहे. यापूर्वी 2020 मध्ये विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू 237 दशलक्ष डॉलर आणि 2021 मध्ये 185.7 दशलक्ष डॉलर होती. रणवीर सिंह याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये एका वर्षाच्या तुलनेत जवळपास 29 टक्के वाढ झाली आहे. 2021 मद्ये रणवीरची ब्रँड व्हॅल्यू 158.3 दशलक्ष डॉलर होती.

अक्की कितव्या क्रमांकावर

अभिनेता अक्षय कुमार क्रोलच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू 153.6 दशलक्ष डॉलर आहे. तर या यादीत चौथ्या क्रमांकावर अर्थातच आलिया भट्ट आहे. तिची ब्रँड व्हॅल्यू 1.02.9 दशलक्ष डॉलर आहे. दीपिका पादुकोण हिने 82.9 दशलक्ष डॉलरसह या यादीत पाचवा क्रमांक पटकावला आहे. तर टॉप-10 मध्ये अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन, पूर्व क्रिकेटर एम एस धोनी, सचिन तेंडूलकर आणि शाहरुख खान यांचा समावेश आहे.

दक्षिणेतील स्टारचा पण धमाका

दक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीजच्या स्टारनी या यादीत स्थान बळकट केले आहे. अल्लू अर्जून आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची या यादीत पहिल्यांदाच एंट्री झाली आहे. टॉप-25 मध्ये त्यांनी स्थान बळकट केले आहे. अल्लू अर्जून 31.4 दशलक्ष डॉलरच्या ब्रँड व्हॅल्यूसह यादीत 20 व्या स्थानी आहे. तर रश्मिका या यादीत 25.3 दशलक्ष डॉलरसह 25 व्या स्थानावर आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.