Ratan Tata यांनी पोलिसांच्या बाईकच्या टाकीत टाकली साखर.. कारण आहे खास, इतिहासाच्या पानात दडलेली ही स्टोरी तुम्हाला माहिती आहे का?

Ratan Tata Untold Story : रतन टाटा यांना काळाने आपल्यातून हिरावून घेतले. एक आदर्श उद्योजक, शांत, संयमी आणि मृदू व्यक्ती म्हणून ते अधिक लोकप्रिय होते. पण त्यांनी एकदा पोलिसांच्या बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये साखर टाकली होती. हे वाचून तुम्हाला पण धक्का बसेल. पण त्यांनी का केले असे कृत्य?

Ratan Tata यांनी पोलिसांच्या बाईकच्या टाकीत टाकली साखर.. कारण आहे खास, इतिहासाच्या पानात दडलेली ही स्टोरी तुम्हाला माहिती आहे का?
रतन टाटा
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 2:13 PM

टाटा समूहाला उभारी देऊन नवीन उंचीवर पोहचवण्याचे काम रतन टाटा यांनी केले. त्यांचा आजही मोठा चाहता वर्ग आहे. काळाने त्यांना आपल्यातून हिरावून घेतले. 9 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांचे निधन झाले. त्या काळातही त्यांनी चाहत्यांसाठी संदेश दिला होता. एक आदर्श उद्योजक, शांत, संयमी आणि मृदू व्यक्ती म्हणून ते अधिक लोकप्रिय होते. पण त्यांनी एकदा पोलिसांच्या बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये साखर टाकली होती. हे वाचून तुम्हाला पण धक्का बसेल. पण त्यांनी हे कृत्य केले होते. त्यामागे मोठे कारण होते. ते वाचलं तर तुम्हाला त्यांची भूमिका नक्की पटेल.

का टाकली पोलिसांच्या बाईकमध्ये साखर?

रतन टाटा (Ratan Tata) हे लहानपणी मुंबईत राहत होते. त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीने जोर धरलेला होता. रतन टाटा या चळवळीचे साक्षीदार होते. त्यांचे घर बॉम्बे हाऊस हे आझाद मैदानाजवळ होते. तिथून त्यांना आझाद मैदानावरील घडामोडी दिसत. मुंबईत स्वातंत्र्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत, हे ते पाहात होते. त्यावेळी होत असलेल्या सभा, रॅली या त्यांनी पाहिल्या होत्या. त्यामुळे आपणही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवावा असे त्यांना वाटे. लहान असल्याने त्यांनी या चळवळीत खारीचा वाटा उचलला. त्यांनी ब्रिटिश सैनिकांच्या पेट्रोल बाईकमधील टाकीत साखर टाकली. हा एक प्रकारे ब्रिटिश सत्तेचा निषेधच होता.

हे सुद्धा वाचा

भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मोलाचे सहकार्य

भारतीय स्वातंत्र्य चळवळीला टाटा कुटुंबाने मोठी मदत केली आहे. महात्मा गांधी आणि त्यांचे राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांच्या चळवळीला आर्थिक मदत दिली आहे. टाटा समूहाने या चळवळीला पूरक व्यवस्था टिकण्यासाठी भरीव आर्थिक मदत केली. फिनिक्स सेटलमेंट, टॉल्स्टॉय फार्म आणि इंडियन ओपिनियन वृत्तपत्र टिकवण्यासाठी टाटा कुटुंबाने 1,25,000 रुपये दिले होते. ही त्याकाळी मोठी रक्कम होती.

जेआरडी टाटा यांनी काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्य चळवळीत मोठी मदत केली. पण भारत स्वतंत्र झाल्यावर काँग्रेसच्या काही धोरणांना त्यांनी कडाडून विरोध सुद्धा केला. त्यांनी स्वतंत्र पक्षाला पाठिंबा देण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र सुद्धा पाठवले. भारतीय औद्योगिक चळवळीला चालना देण्यासाठी भारतीय बैठक बसवावी लागेल, असा जेआरडी टाटा यांचा आग्रह होता. ते स्वदेशी चळवळीचे खंदे समर्थक होते. टाटा कुटुंबियांनी स्वातंत्र्य चळवळीतच नाही अनेक सामाजिक उपक्रमात भरभरून योगदान दिले आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून अजूनही अनेक सामाजिक कार्यात सढळ हाताने मदत करण्यात येते.

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.