Tata Share : टाटाच्या या शेअरची छप्परफाड कमाई! 1 लाखाचे झाले 1 कोटी

Tata Share : टाटा समूहाच्या या शेअरने जोरदार परतावा दिला आहे. या स्टॉकमध्ये एक लाख गुंतवणूक करणाऱ्यांना एक कोटी रुपये मिळाले आहे.

Tata Share : टाटाच्या या शेअरची छप्परफाड कमाई! 1 लाखाचे झाले 1 कोटी
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 4:32 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात टाटा समूहाच्या (Ratan Tata) कंपनीने गुंतवणूकदारांना भरभरून दिले. कंपनीने जोरदार परतावा दिला. बाजारात गेल्या दोन आठवड्यांपासून तेजीचे सत्र दिसून येत आहे. पण त्यापूर्वी शेअर बाजारावर जागतिक घडामोडीचे सावट वाढत होते. परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) गुंतवणूक काढण्याचा सपाटा लावला होता. पण अमेरिकतील बँकिंग संकटानंतर गुंतवणूकदारांनी त्यांचा मोर्चा आशिया आणि भारतीय बाजाराकडे वळविला आहे. भारतीय कंपन्यांनी जबरदस्त कामगिरी केल्याने बाजारात मोठे घसरणीचे आले नाही.

TCS ची कमाल टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेजचा (Tata Consultancy Services Ltd) शेअर सध्या तेजीत आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. टीसीएसच्या शेअरमध्ये (TCS Share Price) एक लाख गुंतवणूक करणाऱ्या गुंतणूकदारांना लॉटरी लागली. त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज एक कोटी झाले आहे. कधी 118 रुपये असणारा हा शेअर आज 3100 रुपयांच्या पुढे आहे.

करोडपती गुंतवणूकदार टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेज (Tata Consultancy Services Ltd) च्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 2 वेळा बोनस शेअर मिळाले आहेत. 20 फेब्रुवारी 2009 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) हा शेअर 118.49 रुपये होता. त्यावेळी एक लाख रुपये गुंतवणूक करुन जवळपास 843 शेअर आले असते. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेजने जून 2009 रोजी 1:1 प्रमाणात आणि मे 2018 मध्ये 1:1 प्रमाणात बोनस शेअर दिले होते.

हे सुद्धा वाचा

शेअरमध्ये झाली वाढ या बोनस शेअरमुळे गुंतवणूकदारांकडील शेअर वाढले. ते 3372 झाले. गेल्या 13 एप्रिल 2023 रोजी बीएसईवर टीसीएसचा शेअर 3189.85 रुपयांवर बंद झाला. जर एखाद्याने हे शेअर होल्ड केले असते तर त्यांचे मूल्य आता 1.07 कोटी रुपये झाले असते.

2500 टक्के रिटर्न टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेजच्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 2500 टक्के बंपर रिटर्न मिळाला आहे. गेल्या 10 वर्षांत या शेअरमध्ये एक लाखांची गुंतवणूक करणाऱ्यांना 9 लाखांपेक्षा अधिकचा परतावा मिळाला आहे. तर गेल्या 6 महिन्यात टीसीएसच्या स्टॉकने दोन टक्के जास्त परतावा दिला आहे. एका वर्षात हा स्टॉक 9.53 टक्के घसरला आहे. परंतु, टीसीएसच्या शेअरने गुंतवणूकदारांना सलग परतावा दिला आहे. टीसीएसने 2022-23 या आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीत नफ्यात 14.8 टक्के उसळी घेतली. टीसीएसला 11,392 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

शेअरमध्ये मोठी गुंतवणूक मार्च 2023 तिमाहीमधील आकेडवारीनुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 4,69,45,970 इक्विटी शेअर असून कंपनीत त्यांचा वाटा 5.29 टक्के इतका आहे. या शेअरचे मूल्य जवळपास 12,138.6 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्यांची या कंपनीत 5.2 टक्के हिस्सेदारी होती. सध्या या शेअरची किंमत 2583.90 रुपये आहे. गेल्यावर्षी पेक्षा हा शेअर केवळ 0.71 टक्के वाढला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.