Raymond चे गौतम सिंघानिया यांच्या पत्नीचा नवीन व्हिडिओ आला समोर, सगळेच झाले आश्चर्यचकित

Gautam Singhania | टेक्सटाईल कंपनी Raymond चे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष गौतम सिंघानिया आणि पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यात सर्वच काही आलबेल नसल्याचे समोर आले होते. त्यांच्या पत्नीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे 'तुझं-माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना' असा तर हा मामला नाही ना, असं वाटत आहे.

Raymond चे गौतम सिंघानिया यांच्या पत्नीचा नवीन व्हिडिओ आला समोर, सगळेच झाले आश्चर्यचकित
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 11:02 AM

नवी दिल्ली | 15 नोव्हेंबर 2023 : टेक्सटाईल ब्रँड रेमंड हा सर्वांनाच परिचित आहे. तर सध्या या रेमंडचा फॅमिली ड्रामा चव्हाट्यावर आला आहे. या ड्राम्याचे अनेक भाग आता समोर येत आहे. दिवाळीत रेमंड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी मोठा बॉम्ब फोडला. पत्नी नवाज मोदी सिंघानिया हिच्यासोबतचा 32 वर्षांचा सुखी संसार या वळणावर मोडत असल्याचे त्यांनी जगजाहीर केले. पत्नीपासून फारकतीचा निर्णय त्यांनी सांगितला. तर त्यांच्या पत्नीने पण आरोपांची काही कमी आतषबाजी केली नाही. रेमंड समूहाच्या दिवाळीच्या पार्टीत आमंत्रण देण्यात आले, पण त्यांना प्रवेश देण्यात आला नाही असा आरोप त्यांनी एका व्हिडिओत केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत त्या पार्टीस्थळी धरणे देत असल्याचे दिसून आले. पण कहाणीत हा ट्विस्ट आला आहे.

नवीन व्हिडिओ शेअर

हे सुद्धा वाचा

तर आता आणखी एक व्हिडिओ त्यांनी समोर आणला आहे. नवाज मोदी सिंघानिया यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.गौतम सिंघानिया यांनी हे दोघे पती-पत्नी वेगळे होत असल्याची पोस्ट शेअर केली, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. काय आहे या नवीन व्हिडिओत ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला…

सासरीच केली दिवाळी साजरी

नवाज मोदी सिंघानिया यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्या सासरीच दिवाळी साजरी करत असल्याचे दिसून येत आहे. या कठीण परिस्थितीत सासरकडील मंडळी त्यांच्या पाठिशी असल्याचे दिसून आले. सासरकडील मंडळींसोबत दिवाळी साजरी करत असल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. त्यांच्या नवीन पुस्तकाची माहिती पण त्यांनी या पोस्टमध्ये दिली आहे.

गौतम सिंघानिया यांची पोस्ट

उद्योजक गौतम सिंघानिया यांची पोस्ट सोमवारी व्हायरल झाली. त्यांनी ट्विटर, आताचे एक्सवर ही पोस्ट केली. त्यात नवाज मोदी सोबतचा सुखी संसार मोडीत आल्याचे त्यांनी म्हटले. ही पोस्ट त्यांनी जड अंतकरणाने लिहिल्याचे दिसून येते. ही दिवाळी पूर्वीच्या दिवाळी सारखी नसल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. 32 वर्षांचा दोन व्यक्तींचा एकत्रित प्रवास वेगळा झाल्याचे त्यांनी नमूद केले. पत्नीपासून फारकत घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी निहारिका आणि नीसा या दोन्ही मुलींचा या पोस्टमध्ये उल्लेख केला. आता वेगळे जरी होत असलो तरी मुलींबाबतीत ते योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी नमूद केले होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.