Corona | पुढील तीन महिने EMI ला स्थगिती द्या, RBI च्या सल्ल्याचे तुमच्यावर काय परिणाम?
पुढील तीन महिने ईएमआयला स्थगिती द्या, असा सल्ला अन्य बँकांना देत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली आहे. (RBI moratorium on payment of EMI)
मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयही मैदानात उतरली आहे. पुढील 3 महिने EMI ला स्थगिती द्या, असा सल्ला रिझर्व्ह बँकेने अन्य बँकांना दिला आहे. लॉकडाऊनच्या काळात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात मोठी कपात केली. आरबीआयने रेपो दरात 0.75 टक्क्यांची कपात केली. त्यामुळे रेपो दर 5.15 वरुन 4.40 टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दर 4.9 टक्क्यांवरुन 4 टक्क्यांवर आला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे सर्व प्रकाराच्या कर्जावरील व्याजदर कमी होतील. (RBI moratorium on payment of EMI)
पुढील 3 महिने कोणत्याही कर्जावरील हप्ते अर्थात EMI ला स्थगिती द्या, असा सल्ला रिझर्व्ह बँकेने अन्य बँकांना दिला आहे. या सल्ल्यानुसार खासगी आणि सरकारी बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था निर्णय घेऊ शकतात. तसेच गृहकर्ज देणाऱ्या फायनान्स कंपन्याही ग्राहकांना दिलासा देऊ शकतात. परंतु आरबीआयने केवळ सल्ला दिला आहे. त्यामुळे हा सल्ला बँका ऐकणार का, हे पाहावं लागेल.
तीन महिने हप्ता द्यावा लागणार नाही, याचा अर्थ तुमचा हप्ता माफ झाला, असा होत नाही. बँका तुमच्या कर्जाची पुनर्रचना करणार आहे. म्हणजे तुम्ही दहा वर्षांसाठी कर्ज काढले असेल, तर तुमच्या कर्जफेडीचा कालावधी तीन महिन्यांनी वाढणार आहे. म्हणजेच दहा वर्षे तीन महिने असा कालवधी होईल. जर तुम्हाला ‘या’ तीन महिन्यानंतर हप्त्यामध्ये वाढ करुन बुडालेला हप्ता फेडायचा असेल, तर त्याच कालावधीत (दहा वर्ष) कर्ज फेडण्याचा पर्यायही बँका देऊ शकतात. (RBI moratorium on payment of EMI)
आरबीआयचा निर्णय 31 मार्चपासून लागू होणार आहे. एखाद्या व्यक्तीने होम लोन किंवा पर्सनल लोन घेतले असेल आणि तीन महिने ईएमआय देण्याची त्याची परिस्थिती नसेल तर त्याला कोणताही दंड आकारला जाणार नाही. या तीन महिन्यात एकही हप्ता न गेल्याने सिबिल स्कोअरवर याचा परिणाम होणार नाही. तसे आदेश आरबीआयने दिले आहेत. तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा हप्ता सुरु होणार आहे. या थकलेल्या ईएमआयचे तीन महिन्यांचे अतिरिक्त व्याज द्यावे लागणार, ही बाब मात्र दिलासा देणारी नाही.
One more relief to common man & businesses!@RBI announced 3 months moratorium on payments of EMI & interest on working capital. Much needed decision and a big step as #IndiaFightsCorona #StayAwareStaySafe#rbigovernor https://t.co/ZNoAqynQmo
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 27, 2020
(RBI moratorium on payment of EMI)