RBI cuts repo rate : रेपो रेटमध्ये कपात, RTGS, NEFT व्यवहारावर शुल्क नाही
आरबीआयने ऑनलाईन व्यवहारावरील NEFT आणि RTGS चार्जेस हटवण्याचा निर्णय घेतला. तसेच हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश बँकांना दिले.
RBI cuts repo rate नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच रिझर्व्ह बँकेने नागरिकांना मोठी भेट दिली आहे. आरबीआयने रेपो दरात पुन्हा एकदा पाव टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे कर्जाच्या व्याजदरात कमी होऊन हप्ता कमी होण्याची चिन्हं आहेत. रेपो दर 5.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे आरबीआयने ऑनलाईन व्यवहारावरील NEFT आणि RTGS चार्जेस हटवण्याचा निर्णय घेतला. तसेच हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश बँकांना दिले.
RBI has decided to do away with charges levied on RTGS and NEFT transactions, banks will be required to pass this benefit to their customers. pic.twitter.com/p9kcR6q6fZ
— ANI (@ANI) June 6, 2019
रेपो दरात तिसऱ्यांदा कपात
आरबीआयने सलग तिसऱ्यांदा रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली. रेपो दरात कपात केल्याने रिव्हर्स रेपो दरातही कपात होते. यापूर्वीच्या दोन बैठकांमध्ये आरबीआयने पाव टक्क्यांची कपात केली होती. रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला होता, त्यांच्या जागी शक्तीकांत दास यांची गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर सलग तीन वेळा रेपो दरात कपात झाली.
तुम्हाला फायदा काय?
रेपो दरात कपात केल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना होतो. आरबीआयने व्याजदर कपात केल्यामुळे बँकांवरही व्याजदर कपातीसाठी दबाव असेल. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज यांसारखेंचे हप्ते कमी होतील.
रेपो दर म्हणजे काय?
रेपो दर किंवा रेपो रेट म्हणजे बँका रिझर्व्ह बँकेकडून ज्या दराने पैसा घेते तो दर. रेपो दर वाढल्यास, बँकांना रिझर्व्ह बँकांना वाढीव व्याजदराने पैसे द्यावे लागतात. त्याचा परिणाम म्हणून बँक आपल्या कर्जदारांचं व्याजदर वाढवते. त्यामुळे रेपो दरात कपात झाल्यास, बँकाही आपल्या कर्जदारांचं व्याजदर कमी करतात. रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळतात. त्यामुळे बँका कर्जदारांना पैसे देताना कमी दरात देऊ शकतात.
रिव्हर्स रेपो
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट. जशा बँका आरबीआयकडून कर्ज घेतात, तसं आरबीआयही बँकाकडून कर्ज घेतात, ठेवी ठेवल्या जातात. तो दर म्हणजे रिव्हर्स रेपो दर होय. रेपो दरामध्ये बदल झाल्यानंतर तोच दर रिव्हर्स रेपो दराला लागू होतो.
संबंधित बातम्या
रेपो रेटमध्ये कपात, तुमचा फायदा कसा होणार?
तुमच्या गृहकर्जाचा EMI कमी होणार, आरबीआयकडून दिलासा