Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Digital Rupee: डिजिटल रुपयाचे ग्रँड ओपनिंग, पहिल्याच दिवशी रुपयाचा खणखणीत आवाज..

Digital Rupee: डिजिटल रुपया पहिल्याच दिवशी दणकावून चालला..

Digital Rupee: डिजिटल रुपयाचे ग्रँड ओपनिंग, पहिल्याच दिवशी रुपयाचा खणखणीत आवाज..
डिजिटल रुपयावर उड्याImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 2:40 PM

नवी दिल्ली : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर RBI ने डिजिटल रुपया (Digital Rupee) बाजारात दाखल झाला. भारतीय रिझर्व्ह बँकेने सुरु केलेल्या डिजिटल चलनासाठी पायलट प्रकल्प (Pilot Project) राबविण्यात आला. यामध्ये आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) सहित इतर बँकांनी सहभाग घेतला. या बँकांनी सरकारी सिक्युरिटीमध्ये व्यवहार केला.

ICICI Bank ने केंद्रीय डिजिटल चलन बँकेच्या (CBDC) डिजिटल रुपयाचा वापर करत IDFC First Bank ला जीएस 2027 सिक्युरिटीची विक्री केली. पहिल्या व्यवहारानंतर इतर बँकांनीही व्यवहार केले.

पहिल्याच दिवशी डिजिटल रुपयाच्या माध्यमातून एकूण 275 कोटींचे 48 व्यवहार पूर्ण झाले. भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा आणि कोटक महिंद्रा बँकेने ही या पायलट प्रकल्पात सहभाग घेतला.

हे सुद्धा वाचा

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पहिल्या भारतीय डिजिटल रुपयाची (Digital Rupee) पहिली पायलट चाचणी सोमवारपासून सुरु केली. 1 नोव्हेंबरपासून आरबीआयने याचा वापर सुरु केला.

सध्या ग्राहक या डिजिटल करन्सीचा वापर सरकारी सुरक्षित व्यवहारात करु शकतात. सरकारी सुरक्षित व्यवहारातील दुय्यम व्यवहार डिजिटल रुपयामार्फत पूर्ण केले जातील, असे RBI ने स्पष्ट केले आहे.

या प्राथमिक चाचणीत भाग घेण्यासाठी आरबीआयने देशातील काही बँकांना आमंत्रण दिले. या बँकांमध्ये भारतीय स्टेट बँक (SBI), बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), कोटक महिंद्रा बँक, यस बँक, IDFC फर्स्ट बँक आणि HSBC बँक यांचा समावेश आहे.

चलनाचे इलेक्ट्रॉनिक्स रुप म्हणजे डिजिटल करन्सी आहे. डिजिटल मनी, इलेक्ट्रॉनिक मनी, इलेक्ट्रॉनिक करन्सी, सायबर कॅश असे या चलनानाला नावे आहेत.