मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्ज घेणाऱ्या कंपन्यांसाठी चालू खाते उघडण्याच्या (Current Account) नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. यासाठी 15 डिसेंबरपर्यंत या नव्या नियमांची मुदत वाढण्यात आली आहे. त्याची अंतिम तारीख 5 नोव्हेंबर होती. नवीन नियमांनुसार, ज्या बँकेतून ग्राहक कर्ज घेणार आहेत त्यांना संबंधित बँकेमध्ये चालू खातं किंवा ओव्हरड्राफ्ट खातं (Overdraft Account) उघडावं लागणार आहे. (rbi extends deadline for compliance with current accounts circular to December 15)
यामुळे लेन्डर्स बँके म्हणजेच कर्ज देणाऱ्या बँकेला कंपनीच्या रोख रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल. ज्या ग्राहकांनी बँकांकडून 50 कोटी रुपयां पेक्षा अधिक कर्ज घेतलं आहे किंवा ज्यांना क्रेडिट सुविधा मिळाली आहे अशांना हा नियम लागू होणार आहे.
खरंतर, ओव्हरड्राफ्ट हेसुद्धा एका प्रकारचं कर्ज आहे. यामध्ये ग्राहक त्यांच्या बँक खात्यातून शिल्लक रक्कमेपेक्षा अधिक पैसे काढू शकतात. या जास्तीच्या पैशाची ठराविक वेळेत परतफेड ग्राहकांना करावी लागते. ज्यामध्ये व्याजही आकारलं जातं.
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ग्राहक अनेक बँकांकडून कर्ज घेतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी चालू खाती उघडतात. यामुळे नंतर अडचण होऊ शकते. अशा वेळी कोणत्याही बँकेने रोख रक्कम किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची चालू खाती उघडू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
6 ऑगस्टच्या परिपत्रकात नियामकाने दिलेल्या आदेशानुसार, बँकिंग प्रणालीकडून CC/ OD स्वरूपात क्रेडिट सुविधा मिळवणाऱ्या ग्राहकांसाठी कोणतीही बँक चालू खातं उघडणार नाही आणि सर्व व्यवहार CC/ OD खात्यातूनच पाठवले जातील.
इतर बातम्या –
पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल साडे आठ लाख नागरिकांना कोरोना संसर्ग होऊन गेला : सर्व्हे
VIDEO : “कांजूर मार्गमधील जागा राज्य सरकारची” – सुप्रिया सुळे#kanjurmarg #Metro #MetrocarShed @OfficeofUT @CMOMaharashtra @supriya_sule pic.twitter.com/WPz8OiAvIU
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2020
(rbi extends deadline for compliance with current accounts circular to December 15)