RBI ला अच्छे दिन; सोन्याच्या आणि परकीय चलनाच्या साठ्यात मोठी वाढ

RBI कडील सोन्याच्या साठ्यात आठवडाभरात आठ कोटी डॉलर्सची भर पडली | RBI gold

RBI ला अच्छे दिन; सोन्याच्या आणि परकीय चलनाच्या साठ्यात मोठी वाढ
1 किलो, 100 ग्रॅम आणि 50 ग्रॅमच्या ईजीआरसाठी समान ट्रेडिंग लॉट असेल. 5 ग्रॅम, 10 ग्रॅमचे ईजीआर देखील असतील परंतु वितरण किमान 50 ग्रॅम असेल. इतर सिक्युरिटीज प्रमाणे ट्रेडिंग फीचर्स देखील समान असतील. शाश्वत आयुष्याच्या बाबतीत, तिजोरीचा खर्च देखील ईजीआर धारकाद्वारे उचलला जाईल. ईजीआर इतर सिक्युरिटीजप्रमाणे एसटीटीला आकर्षित करेल. EGR ला फिजिकल सोन्यात रूपांतरित केल्याने GST आकर्षित होईल. एकापेक्षा जास्त राज्यांमधील व्यवहारांवर IGST ची सूचना.
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 1:33 PM

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुवर्णभांडारात सलग दुसऱ्या आठवड्यात मोठी भर पडल्याची माहिती समोर आली आहे. आरबीआयच्या (RBI) माहितीनुसार, विदेशी चलन मालमत्तेत (FCA) आणि सोन्याच्या साठ्यात (Gold Reserve) मोठी वाढ नोंदवली गेली आहे. त्यानुसार RBI कडील सोन्याच्या साठ्यात आठवडाभरात आठ कोटी डॉलर्सची भर पडली. त्यामुळे आरबीआयकडील सोन्याच्या साठ्याचे एकूण मूल्य 34.63 अब्ज डॉलर्स इतके झाले आहे. (RBI Foregin currency e and gold reserve jumps to record break level)

RBI च्या विदेशी चलनाच्या साठ्यातही वाढ

गेल्या आठवड्यात 19 मार्चला नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार चालू आठवड्यात RBI कडील सोन्याच्या साठ्यात 23.3 कोटी डॉलर्सची भर पडून हा साठा 582.271 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचला. त्यापूर्वीच्या आठवड्यात या साठ्यात 1.74 अब्ज डॉलर्सची भर पडली होती.

ट्विटरवर RBI सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बँक

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) ट्विटर ‘फॉलोअर्स’ची संख्या दिवसागणिक वाढत असून, आता ती संख्या 10 लाखांवर गेली आहे. रिझर्व्ह बँक अशी कामगिरी करणारी जगातील पहिली मध्यवर्ती बँक बनली आहे. मायक्रोब्लॉगिंग साइटवर रिझर्व्ह बँकेने 10 लाख फॉलोअर्ससह अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह (Federal Reserve) आणि युरोपियन सेंट्रल बँकेला (European Central Bank) मागे टाकले आहे. रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर हँडलवर उपलब्ध माहितीनुसार, 27 सप्टेंबर 2020 रोजी त्याचे फॉलोअर्स 9.66 लाख होते, ते फॉलोअर्स 10 लाखांवर गेले आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंतर 7,74,000 फॉलोअर्ससह दुसर्‍या क्रमांकावर बँको डी मेक्सिको (बँक ऑफ मेक्सिको) आहे. जगातील सर्वात शक्तिशाली मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हचे ट्विटरवर फक्त 6.67 लाख फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या फॉलोअर्सची संख्या 5.91 लाख आहे.

संबंधित बातम्या:

Gold Prices Today: सोनं खरेदी करायचं असेल तर लगेच करा; होळीनंतर दर चार हजारांनी वधारणार?

ट्विटरवर RBI सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बँक, नेमकं कारण काय?

20 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार, आरबीआयची घोषणा

(RBI Foregin currency e and gold reserve jumps to record break level)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.