रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी द नाशिक मर्चन्ट्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेसह तीन सहकारी बँकांना दंड (Penalty) ठोठावला आहे. नियमांच्या पालनात ढिलाई केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. फ्रॉडची सूचना (Fraud) आणि निगराणी यांसदर्भात नाबार्डद्वारे ( राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक) देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन न केल्याने मुंबईस्थित महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंकेला 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वीही, गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली होती. रेग्युलेटरी नियमांच्या पालनात ढिलाई केल्याने रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेला 1 कोटी 05 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. इंडसइंड बँकेविरोधाही कारवाई करण्यात आली होती.
दि नाशिक मर्चन्ट्स को-ऑपरेटिव्ह बँकेसह इतर बँकांना 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकेतील ठेवींचे नियोजन आणि ठेवींवरील व्याज या संदर्भात रिझर्व्ह बँकेतर्फे जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
बिहारमधील बेतिया येथील नॅशनल सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला जागरुकता कोष आणि केवायसी (KYC-know your customer)च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नियम पालनातील ढिलाईमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
याआधीही रिझर्व्ह बँकेने नियमांच्या पालनात ढिलाई झाल्याने फेडरल बँकेला 5.72 कोटी रुपये तर बँक ऑफ इंडियाला 70 लाख रुपयांचा दंड ठोठावत कारवाई केली होती.
तर गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली होती. रेग्युलेटरी नियमांच्या पालनात ढिलाई केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला. खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच या कारवाईबद्दल माहिती दिली होती. रेग्युलेटरी नियमांच्या पालनात ढिलाई केल्याने रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेला 1 कोटी 05 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच केवायसी नियमांचे पालन न केल्याने इंडसइंड बँकेविरोधातही कारवाई करण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेने आखून दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यानेच या बँकांविरोधात कारवाईचे मोठे पाऊल उचलण्यात आले होते.