मुंबई : रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर (PMC Bank) सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. बँकेने (PMC Bank) तसे एसएमएस ग्राहकांना पाठवले आहेत. या मेसेजेसनंतर पीएमसी बँकेबाहेर ग्राहकांच्या पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या आहेत. ग्राहकांना महिन्यातून केवळ एक हजार रुपयेच काढता येणार आहेत. परिणामी खातेदारांची घालमेल सुरु झाली आहे.
आरबीआयने निर्बंध लागल्याने पीएमसी बँकेला आर्थिक देणी-घेणी करताना मर्यादा येणार आहेत. नवी कर्जे देणे, नव्या ठेवी स्वीकारणे, खातेधारकांचे पैसे भागवणे यावर निर्बंध आहेत. बँकेने आज सकाळपासून तसे मेसेज पाठवले. मात्र भाईंदरमधील इंद्रलोक बँकेसमोर खातेधारकांनी पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केल्याने, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भारतात पंजाब आणि महाराष्ट्र बँकेच्या 6 राज्यात शाखा आहेत. त्या सर्व शाखांबाहेर आता गर्दी होत आहे.
महिन्यातून केवळ 1 हजार रुपये काढता येणार
आरबीआयच्या निर्बंधामुळे एका खातेधारकाला एका खात्यातून केवळ 1 हजार रुपयेच काढता येणार आहेत. म्हणजे 6 महिन्यात केवळ 6 हजार रुपयेच काढता येतील. तुमच्या खात्यात कितीही रक्कम असली तरी महिन्यातून केवळ 1 हजार रुपयेच काढता येतील.
खातेदारांवर निर्बंध काय?
बँकेवर कोणकोणते निर्बंध?
रिझर्व्ह बँकेने जे निर्बंध घातले आहेत, त्याची माहिती प्रत्येक ठेवीदाराला देणे बंधनकारक आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेला दिली आहे.