आरबीआयकडून सलग चौथ्यांदा रेपोरेटमध्ये वाढ; कर्जाचा हफ्ता नेमका कितीने वाढणार जाणून घ्या

भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून नवं पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. नवं पतधोरण जाहीर करताना आरबीआयकडून पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे.

आरबीआयकडून सलग चौथ्यांदा रेपोरेटमध्ये वाढ; कर्जाचा हफ्ता नेमका कितीने वाढणार जाणून घ्या
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 11:20 AM

नवी दिल्ली : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून (RBI) नवं पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. नवं पतधोरण जाहीर करताना आरबीआयकडून पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ करण्यात आली आहे. आरबीआयकडून रेपो रेट 50 बेसीस पॉईंटने वाढवण्यात आला आहे. रेपो रेट वाढवण्याची यंदा ही चौथी वेळ आहे. यापूर्वी तीन वेळेस आरबीआयकडून रेपो रेट वाढवण्यात आला आहे. रेपो रेटमध्ये 50 बेसीस पॉईंटची वाढ करण्यात आल्यानं रेपो रेट 5.9 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई (inflation) नियंत्रणात आणण्यासाठी रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाकडून सातत्याने रेपो रेटमध्ये वाढ करण्यात येत आहे.

चालू वर्षात चौथ्यांदा वाढ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण आढावा बैठकीत पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यंदा आरबीयाकडून रेपो रेटमध्ये करण्यात आलेली ही चौथी दर वाढ आहे. यापूर्वी मे महिन्यात रेपो रेटमध्ये 0.4 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय आरबीआयने जाहीर केला होता. त्यानंतर जून आणि जुलैमध्ये रेपो रेट अर्ध्या टक्क्याने वाढवण्यात आला होता.आज तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये अर्धा टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर चालू वर्षात रेपो रेट एकून चार वेळा वाढवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

बैठकीला सहा सदस्यांची उपस्थिती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये रेपो रेट 50 बेसीस पॉईंटने वाढवण्याच निर्णय घेतला आहे. या बैठकीला एकूण 6 सदस्यांची उपस्थिती होती. सहा सदस्यांपैकी 5 सदस्य हे रेपो रेट 50 बेसीस पॉईंट वाढवण्यात यावा या बाजुने होते. त्यामुळे रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्याने महागाई नियंत्रणात येण्याची अपेक्षा असल्यांचं गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे.चालू वर्षात चारदा रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ईएमआय आणि कर्जाच्या व्याजदरात वाढ होणार आहे. मात्र दुसरीकडे बँका देखील एफडीवरील व्याज दर वाढवू शकतात.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.