Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI Inflation : सणावर महागाईचे सावट! डाळीचे भाव असे भिडले गगनाला

RBI Inflation : महागाईविरोधात सरकारने शड्डू ठोकले आहे. त्यासाठी प्रयत्न पण करण्यात येत आहे. डाळीचे भाव गगनाला भिडलेले आहे. सप्टेंबर महिन्यापासून सणांचा हंगाम सुरु होत आहे. त्यामुळे डाळीचे भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहे. नाहीतर सणांचा आनंदावर विरजण पडेल.

RBI Inflation : सणावर महागाईचे सावट! डाळीचे भाव असे भिडले गगनाला
Follow us
| Updated on: Sep 03, 2023 | 2:55 PM

नवी दिल्ली | 3 सप्टेंबर 2023 : महागाईने (Inflation) जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नागरिकांना हैराण केले. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक प्रयत्न सुरु केले आहे. निर्यात बंदी, आयात शुल्क अशा उपाय योजना राबविण्यात आल्या आहेत. यापूर्वी काही डाळींनी केंद्र सरकारचे डोकेदुखी वाढवली होती. पण आता जवळपास सगळ्याच डाळींनी डोके वर काढले आहे. किरकोळ महागाईने दोन महिन्यात सर्वसामान्यांना आणि केंद्र सरकारला (Central Government) जेरीस आणले होते. आता डाळीचे दर (Pulses Rate Hike) अजून गगनाला भिडलेले आहेत. या दोन महिन्यांपासून डाळीच्या किंमतीत इतक्या टक्क्यांची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यांपासून सणांचा हंगाम सुरु होत आहे. डाळीच्या दरवाढीला आताच लगाम घातला नाही तर सणाच्या उत्साहावर पाणी फेरले जाऊ शकते. केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला डाळींनी आव्हान दिले आहे.

14 टक्के महागल्या डाळी

ग्राहक विभागाच्या आकड्यानुसार, 1 ऑगस्ट रोजी दिल्लीत हरबरा डाळीचा भाव 72 रुपये होता. 1 सप्टेंबर रोजी ही डाळ 82 रुपये प्रति किलोवर पोहचली. तर दिल्लीत तूरडाळीचा भाव 148 रुपये किलोहून 162 रुपये किलोवर पहोचली. या दरम्यान उडदाच्या डाळीचा भाव 5 रुपयांनी वाढून 132 रुपयांवर पोहचला. मसूर डाळ भाव 4 रुपये प्रति किलोने वाढून 91 रुपये झाली. डाळींचा भाव 14 टक्क्यांनी वाढला.

हे सुद्धा वाचा

महागाई 15 महिन्यांच्या उच्चांकावर

महागाईने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच रेकॉर्ड ब्रेक केला. 30 ते 40 रुपये किलो टोमॅटोचा भाव थेट 300 ते 350 रुपये किलोवर पोहचला. किरकोळ महागाईचा दर 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहचला. हा दर 7.44 टक्क्यांवर गेला. किरकोळ महागाईने या महिन्यात कळस गाठला होता.

भाज्यांनी वाढवला भाव

त्यात भाज्यांनी मोठी भुमिका निभावली. किरकोळ महागाई दर 15 टक्क्यांनी वाढला. टोमॅटोनी त्यात सर्वाधिक भर घातली. जुलैमध्ये किरकोळ महागाई दर दर 7.44 टक्के नोंदविण्यात आला. गावात महागाई दर 7.63 टक्के होता तर शहरात किरकोळ महागाई 7.2 टक्के होता. जुलै महिन्यातच भाज्यांची महागाई 37.34 टक्के होती. डाळींचा महागाई दर 13.27 टक्के होता. ऑगस्ट महिन्यात डाळींच्या किंमतीत जोरदार तेजी आली.

खरीप आला धोक्यात

इकडे खरीप धोक्यात आला आहे. डाळींसाठीची प्रमुख उत्पादक राज्यांना पावसाने ओढ दिल्याने फटका बसला आहे. यावेळी खरीपातील डाळींचे उत्पादन घसरण्याची शक्यता आहे. 1 सप्टेंबरपासून देशातील खरीपाचे उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 11 लाख हेक्टरने कमी होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. एकूण शेती 119.09 लाख हेक्टर नोंदविण्यात आली आहे. यामध्ये तूर, उडीद आणि मुगाचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा घटण्याचा अंदाज आहे.