RBI MPC Meet August 2022 | महंगाई मार गई! घराचा हप्ता वाढणार, RBI ने रेपो रेट दर वाढवला

RBI MPC Meet August 2022 | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात पुन्हा वाढ केली आहे. रेपो रेट 4.90 टक्क्यांहून 5.40 टक्के झाला आहे. त्यामुळे महागाई भडकण्याची शक्यता आहे.

RBI MPC Meet August 2022 | महंगाई मार गई! घराचा हप्ता वाढणार, RBI ने रेपो रेट दर वाढवला
महागाईच्या पुन्हा झळा
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 11:07 AM

RBI MPC Meet August 2022 | भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मौद्रिक नीती समितीच्या(MPC Meeting) आपत्कालीन बैठकीत आताच रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेपो रेट 4.90 टक्क्यांहून 5.40 टक्के झाला आहे. त्यामुळे महागाई भडकण्याची शक्यता आहे. केंद्रीय बँकेने रेपो दरात (Repo Rate) चार महिन्यांत 1.40 टक्क्यांची वाढ केली आहे. ऑगस्ट 2022 मधील बैठक आज शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी संपली. सकाळी 10 वाजता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shakti Kant Das) यांनी रेपो दरात वाढीच्या निर्णयाची घोषणा केली. यावेळी रेपो दरात 0.50 टक्क्यांच्या वाढीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. रेपो दर वाढीच्या निर्णयासहित, गेल्या चार महिन्यांत केंद्रीय बँकेने आतापर्यंत 1.40 टक्क्यांची वाढ केल्याचे स्पष्ट झाले. यामुळे महागाई (Inflation) भडकण्याची शक्यता आहे. आता नागरिकांचे गृहकर्ज(Home Loan) , वाहन कर्ज (Vehicle Loan) , वैयक्तिक कर्जावरील (Personal Loan) ईएमआय (EMI) वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खिश्यावर पुन्हा बोजा पडणार आहे.

4 महिन्यांत तिसऱ्यांदा वाढ

रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक नीती समितीची रेपो रेट संबंधीची ही बैठक या सोमवारपासून ते बुधवारपर्यंत होणार होती. परंतु, काही कारणांमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली. केंद्रीय बँकेने महागाई आटोक्यात आणण्यासाठी यापूर्वी मे 2022 मध्ये रेपो रेटमध्ये वृद्धीचा निर्णय घेतला होता. मे महिन्यात मौद्रिक नीती समितीने बैठक घेतली होती. महागाईचा आलेख कमी करण्यासाठी रेपो दरात वाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मे 2022 मध्ये रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर जून महिन्यात झालेल्या बैठकीत पुन्हा रेपो दरात वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि रेपो दरात 0.50 टक्क्यांचीन वाढ करण्यात आली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या दोन वर्षानंतर पहिल्यांदा मे महिन्यात रेपो दरात बदल केला होता. गेल्या दोन वर्षांपासून रेपो दर 4 टक्के होता. आता या तिसऱ्या वृद्धीमुळे रेपो दर 5.40 टक्क्यांवर पोहलचा आहे.

हे सुद्धा वाचा

महागाई मानगुटीवर

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दर वृद्धीसाठी महागाई कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले. जगभरात महागाईने डोके वर काढले आहे. भारताला महागाईशी सामना करावा लागत आहेत. जून हा सलग सहावा महिना आहे, ज्यामध्ये किरकोळ महागाई दर केंद्रीय बँकेच्या निर्धारीत दरांपेक्षा जास्त आहे. भूराजकीय घडामोंडीमुळे महागाईचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. तरीही आंतरराष्ट्रीय अन्नधान्याच्या किंमतीतील घसरण, युक्रेनमधून गव्हाची निर्यात, देशांतर्गत बाजारातील तेलाच्या किंमतीतील दर घसरण तर दमदार पावसामुळे यंदा अन्नधान्याचे चांगले उत्पादन हाती येण्याची अपेक्षा यामुळे महागाई लवकरच कमी होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे. पण किरकोळ महागाई एकदम कमी होण्याची शक्यता सध्या मात्र दिसत नाही.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.