RBI Gold Reserve : सोने खरेदीत रचला इतिहास! जगातील 5 खरेदीदारांमध्ये आरबीआय

RBI Gold Reserve : भारताच्या केंद्रीय बँक अनेक प्रयोग करत आहे. त्यामध्ये सोने खरेदीत आरबीआयने मोठी झेप घेतली आहे. जगातील पाच सर्वात प्रमुख खरेदीदारांमध्ये केंद्रीय बँकेने पहिल्या पाचमध्ये आघाडी घेतली आहे.

RBI Gold Reserve : सोने खरेदीत रचला इतिहास! जगातील 5 खरेदीदारांमध्ये आरबीआय
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 5:48 PM

नवी दिल्ली : भारतीय गुंतवणूकदार केवळ सराफा बाजारात जाऊन सोने खरेदी करत नाही तर, देशात डिजिटल गोल्डमध्ये (Digital Gold) गुंतवणूक वाढली आहे. केवळ नागरीकच नाही तर देशाची केंद्रीय बँक पण सोने खरेदीत मागे नाही. जगातील पाच सर्वात मोठ्या सोने खरेदीदारांमध्ये आरबीआयचा समावेश झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) सोने खरेदीचा जणू सपाटाच लावला आहे. रिझर्व्ह बँकेने जानेवारी ते मार्च या तिमाहीत सोने खरेदीत (Gold Buying) नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. जगातील इतर बँकांना आरबीआयच्या या कृतीचा मोठा हेवा वाटत आहे. कधी काळी सोने गहाण ठेवण्याची नामुष्की ओढावलेल्या आरबीआयने आता जगात आपला पाच का दम दाखवला आहे.

इतके सोने खरेदी आरबीआयने कोरोनानंतर धोरण बदलविले. केंद्रीय बँकेने सोने खरेदी सुरु केली. जगावर आर्थिक संकट ओढावत असताना, रशिया-युक्रेन यु्द्धानंतर सोने आयात वाढवली. यावर्षीचा विचार केला तर जानेवारी ते मार्च या तिमाहीत आरबीआयने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली. आरबीआयने या तिमाहीत जवळपास 10 टन सोने खरेदी केले.

800 टनाचे भांडार जागतिक आर्थिक अनिश्चितता लक्षात घेता अनेक देशांच्या केंद्रीय बँकांनी सोने खरेदी सुरु केली आहे. त्यात आरबीआयने आघाडी घेतली आहे. आरबीआयकडे एकूण 800 टनाच्या आसपास सोन्याचे भांडार असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा एक विक्रमच आहे. सध्या जगातील एकूण सोन्याच्या साठ्यापैकी आरबीआयकडे 8% सोने असल्याचे सांगण्यात येते.

हे सुद्धा वाचा

सोन्याचा साठा वाढला आरबीआय डेटाचा मनीकंट्रोलने विश्लेषण केले आहे. त्यानुसार, 20 मार्च 2020 पर्यंत सोन्याचा परकीय चलन साठा 6 टक्के होता, तो 24 मार्च 2023 पर्यंत 7.85 टक्क्यांवर पोहोचला. या 24 मार्च रोजी आरबीआयच्या तिजोरीत 3.75 लाख कोटी रुपयांचा सोन्याचा साठा आहे. यापूर्वी 20 मार्च 2020 रोजी आरबीआयकडे 2.09 लाख कोटी रुपयांचं सोनं होतं.

रिझर्व्ह बँकेने 2022 मध्ये एक रिपोर्ट जारी केला होता. त्यानुसार भारताकडे जवळपास 754 टन सोन्याचे भंडार आहे. गेल्या पाच वर्षात सर्वाधिक सोने खरेदी करण्यात आली आहे. सोने खरेदीचा केंद्रीय बँकेचा हा वेग पाहून तुम्हाला आर्श्चयाचा धक्का बसेल. बँकेने सोने खरेदीचा फास्ट ट्रॅक रेकॉर्ड तयार केला होता.

केंद्रीय बँकेने केवळ एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या दरम्यान 132.34 टन सोने खरेदी करुन टाकले. एकाच वर्षात इतकी सोने खरेदी करणारी आरबीआय ही जगातील एकमेव केंद्रीय बँक ठरली. 2021 मध्ये आरबीआय सोने खरेदीत तिसऱ्या क्रमांकावर होती. तर 2020 मध्ये बँकेने केवळ 41.68 टन सोने खरेदी केले होते.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.