RBI EMI : महागाई बॉम्बसाठी रहा तयार! खिशावर पडणार ईएमआयचा भार?

RBI EMI : लवकरच तुमच्यावर महागाईचा बॉम्ब पडू शकतो. बजेटमध्ये महागाई कमी करण्याविषयी ठोस भूमिका मांडण्यात आली नाही. नोकरदारांना कमाईवर दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

RBI EMI : महागाई बॉम्बसाठी रहा तयार! खिशावर पडणार ईएमआयचा भार?
महागाईसाठी रहा तयार
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 6:18 PM

नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांवर पुन्हा एकदा महागाईचा (Inflation) बॉम्ब पडू शकतो. त्यांच्यावर ईएमआयचा (EMI) बोजा पडू शकतो. अगोदरच महागाईने नागरिक हैराण झाले आहेत. पण त्यांना महागाई आटोक्यात आणण्यासाठी त्रास सहन करावा लागू शकतो. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) धोरणानंतर लवकरच ईएमआय वाढू शकतो. सोमवारी, 6 फेब्रुवारीपासून आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक होत आहे. 8 फेब्रुवारीपर्यंत ही बैठक होईल. रॉयटर्स या जागतिक वृत्त संस्थेनुसार, आरबीआय पुन्हा एकदा रेपो दरात (Repo Rate) वाढ करण्याची शक्यता आहे. जर आरबीआयने रेपो दरात वाढीचा निर्णय घेतला तर तुमच्या कर्जावरील व्याजदरात वाढ होईल. कर्ज महाग होईल. त्यावरील हप्ताही वाढेल.

यापूर्वी गेल्या सहा महिन्यांत आरबीआयने रेपो दरात सातत्याने वाढ केली आहे. त्याचा फटका जनतेला सहन करावा लागत आहे. किरकोळ महागाई आटोक्यात येत असली तरी वस्तूंचे दर मात्र अजूनही भडकलेलेच आहे.  जनता महागाईने भरडल्या जात आहे.

धान्य, कडधान्य, दाळी यांच्या किंमतीत मोठी वाढ झालेली आहे. खाद्यतेल त्यामानाने आटोक्यात आले आहे. पेट्रोल-डिझेलचे दर अजूनही गगनाला भिडलेले आहे. सगळ्याच बाजूने सर्वसामान्य नागरिक कोंडीत सापडला आहे. त्याला या दरवाढीचा पुन्हा एकदा फटका बसणार आहे.

हे सुद्धा वाचा

पतधोरण समितीची या वर्षातील ही पहिली बैठक होत आहे. 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान ही बैठक होत आहे. या बैठकीतील निर्णयाची घोषणा अर्थातच 8 फेब्रुवारी रोजी करण्यात येईल. या बैठकीत रेपो दरात वाढीचे यापूर्वीच संकेत देण्यात आले आहेत. या बैठकीत रेपो दर वाढीचा झटका ग्राहकांना बसू शकतो.

रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, आरबीआय या बैठकीत रेपो दरात 25 आधार अंकांची वाढ करु शकते. त्यानंतर रेपो दर 6.50 टक्के होईल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर ईएमआयचा बोजा वाढेल. भारतीय अर्थव्यवस्था अजूनही महागाईपासून सूटकेचा मार्ग शोधत आहे.

आरबीआयने मे पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. डिसेंबरपर्यंत रेपो दर 5.90% होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला होता.

सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर 7.41% होता. महागाई दर घसरला. ऑक्टोबर महिन्यात महागाई दराने मागील तीनही महिन्यांचे रेकॉर्ड बदलले. ऑक्टोबर महिन्यात महागाई दर घसरून 6.77% वर आला. खाद्यान्न आणि अन्नधान्यांच्या किंमती झाल्याचा हा परिणाम होता.

7 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बीपीएसने वाढ करण्यात आली होती. तर आता या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत वाढू शकतो. त्याचा फटका जनतेला बसेल.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.