RBI MPC Meeting : आजपासून आरबीआयच्या ‘एमपीसी’ बैठकीला सुरुवात; आठ जूनला रेपो रेट वाढीची घोषणा?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तीन दिवशीय मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. या बैठकीत पुन्हा एकदा रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

RBI MPC Meeting : आजपासून आरबीआयच्या 'एमपीसी' बैठकीला सुरुवात; आठ जूनला रेपो रेट वाढीची घोषणा?
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 10:23 AM

नवी दिल्ली : भारताची मध्यवर्ती बँक असेलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तीन दिवशीय मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या (RBI MPC Meeting) बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आठ जून रोजी चलनविषयक धोरण समिती बैठकीमधील निर्णय जाहीर करणार आहे. या बैठकीत रेपो रेटमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या आधीच रेपो रेटमध्ये (Repo rate) वाढ होणार असल्याचे संकेत दिले आहेत. सध्या देशात महागाईचा भडका उडाला आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा उपाय म्हणून रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. महागाईला सहा टक्क्यांच्या खाली ठेवण्याचे आरबीआयचे लक्ष्य आहे. त्यामुळे चार मे रोजी आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा आठ जून रोजी रेपो रेटमध्ये वाढीची घोषणा होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

महागाई कमी करण्यासाठी रेपो रेटमध्ये वाढ

चालू आर्थिक वर्षातील पहिली चलनविषयक धोरण समितीची बैठक ही सहा ते आठ एप्रिलदरम्यान झाली होती. मात्र या बैठकीत रेपो रेट वाढवण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. परंतु त्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे देशात महागाईचा भडका उडाला. त्यामुळे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी दोन ते चार मे यादरम्यान चलनविषयक धोरण समितीची आपातकालीन बैठक पार पडली. या बैठकीत रेपो रेटमध्ये 0.40 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मेमध्ये 2020 नंतर प्रथमच रेपो दरात वाढ करण्यात आली. आता पुन्हा एकदा आठ जून रोजी रेपो रेटमध्ये 0.40 बेसिस पॉईंट वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

चालू आर्थिक वर्षात रेपो रेट 5.65 टक्क्यांवर पोहोचणार ?

चालू आर्थिक वर्षात रेपो रेटमध्ये वाढ होऊन तो 5.65 टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे. मे महिन्यात रेपो रेटमध्ये 0.40 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली. 0.40 बेसिस पॉईंट वाढीसह आता रेपो रेट 4.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी तो 5.65 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. महागाई कमी करण्यासाठी आरबीआयकडून रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते केवळ रेपो रेट वाढून महागाई कमी होणार नाही. भारतातील महागाई ही चलनाच्या अतिरिक्त पुरवठ्यामुळे निर्माण झालेली नसून, ती वस्तुंच्या तुटवड्यामुळे निर्माण झाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.