क्रेडिट कार्डने बिल पेमेंट करताय ? RBI ची नवीन मार्गदर्शक तत्वे पाहा

पेटीएम संकटातून बाहेर येत आहे. त्यातच आरबीआयच्या अनेक कठोर नियमानाही देखील सामोरे जावे लागत आहे. परंतू आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमांचे पालन करणारी ही पहिली कंपनी ठरली आहे.

क्रेडिट कार्डने बिल पेमेंट करताय ? RBI ची नवीन मार्गदर्शक तत्वे पाहा
paytm and rbi guide line
Follow us
| Updated on: Jul 02, 2024 | 8:35 PM

तुम्ही जर क्रेडिट कार्डने बिल पेमेंट करीत असाल तर आरबीआयचे नवीन मार्गदर्शक तत्वे तुम्हाला माहिती हवी, कारण आरबीआयने सर्व क्रेडिट कार्डचे पेमेंट आता भारत बिल पेमेंट्स सिस्टीमने ( बीबीपीएस ) करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी 30 जूनपर्यंत डेडलाईन दिली होती. परंतू तरीही फोनपे, क्रेड यांसारख्या काही थर्ड पार्टी एपने ग्राहकांना क्रेडिट कार्डने बिल भरण्याची ऑफर आरबीआयच्या गाईडलाईन्सला बगल दिल्याचे उघडकीस आले आहे. एचडीएफसी, एक्सिस सारख्या प्रमुख बॅंकांनी बीबीपीएसचे प्रणालीचे नियम पाळलेले नाहीत. त्या आपल्या क्रेडिट कार्डने बिल पेमेंट करण्यासाठी IMPS, NEFT, UPI आदी, PhonePe, Cred सारख्या प्रणालीचा उपयोग करीत आहेत. ‘पेटीएम’ हे एकमेव थर्ड पार्टी एप असून तेच केवळ आरबीआयच्या भारत बिल पे सेवेचा आपल्या क्रेडिट कार्डच्या बिलांचे पेमेंट करते.

Paytm वर क्रेडिट कार्डने बिल पेमेंट

भारतीय रिझर्व्ह बँकेने आरबीआयने देशातील सर्व बँका आणि थर्ड पार्टी ॲप्सना केवळ ‘भारत बिल पेमेंट सिस्टम’ (BBPS) प्लॅटफॉर्मद्वारे क्रेडिट कार्ड बिलचे पेमेंट करण्याचे आदेश फेब्रुवारीमध्ये दिले होते. या नियमांसाठी अंतिम तारीख 30 जून 2024 दिली होती. पण तरीही देशातील अनेक बँका तसेच थर्ड पार्टी ॲप्स या नियमाची अद्यापही अंमलबजावणी करु शकलेले नाही. क्रेडिट कार्ड बिल पेमेंटची सुविधा त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ‘भारत बिल पेमेंट सिस्टम’ (BBPS) द्वारेच केली जाईल असे पेटीएमने म्हटले आहे. पेटीएम प्लॅटफॉर्म निवडलेल्या सर्व बँकांचे क्रेडिट कार्ड बिल पेमेंट बीबीपीएस (BBPS) प्लॅटफॉर्मवर केले जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, आयडीबीआय बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक यांचे क्रेडिट कार्डधारकांनी बीबीपीएसवर आल्यास पेटीएमवर ही सेवा घेऊ शकतात.

अनेक एप्स आणि बँकांनी नियम पाळले नाहीत

30 जूननंतर देखील Cred, PhonePe सारख्या थर्ड पार्टी एप्सनी यूजर्सना IMPS, NEFT, UPI माध्यमातून क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करने ऑफर देत आहेत. देशातील क्रेडिट कार्ड बाजारातील सर्वात मोठी खाजगी बॅंकापैकी एचडीएफसी बँक, एक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकने आतापर्यंत बीबीपीएस ने पेमेंट लागू केलेले नाही. त्या अद्यापाही IMPS, NEFT, UPI वर कार्य करीत आहेत. आतापर्यंत ज्या बँका आणि एप्सने या नियमांचे पालन केलेले नाही त्यांनी आता बॅंकांनी आरबीआयकडे 90 दिवसांची मुदत मागितली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.