Digital Currency | भारताच्या डिजिटल करन्सीला लागला मुहूर्त.. आता प्रतिक्षा अवघ्या..
Digital Currency | Central Bank Digital Currency (CBDC) अर्थात भारताच्या डिजिटल करन्सीचा सर्वच जण मोठी प्रतिक्षा करत होते, याविषयीची मोठी अपडेट समोर आली आहे.
Digital Currency | भारताच्या बहुप्रतिक्षीत डिजिटल करन्सीला अखेर मुहूर्त लागला आहे. Central Bank Digital Currency (CBDC) अर्थात भारताच्या डिजिटल करन्सीचा सर्वच जण मोठी प्रतिक्षा करत होते. या चलनाचा वापर वाढल्यास व्यवहारासाठी लागणारा कालावधी आणि खर्चात मोठी बचत होईल. तसेच फाटक्या नोटा, खराब नोटांची डोकेदुखी कमी होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याविषयीचे संकेत दिले आहेत.
याच वर्षात येणार डिजिटल करन्सी
भारतीय रिझर्व्ह बँकेचे डिप्टी गव्हर्नर टी रवि शंकर (T. Rabi Sankar) यांनी डिजिटल करन्सीचा मुहूर्त कधी लागेल याची माहिती दिली. त्यानुसार, पायलट डिजिटल करन्सी याच वर्षात सुरु करण्यात येणार आहे.
प्रस्ताव सादर
केंद्रीय बँकेने CBDC ला याविषयीचा प्रस्ताव दिला आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात डिजिटल करन्सी सुरु करण्याची घोषणा केली होती.
याच आर्थिक वर्षाचा मुहूर्त साधला
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी 2022-23 मधील अर्थसंकल्पात डिजिटल करन्सीची घोषणा केली. तसेच याच आर्थिक वर्षात (Budget) डिजिटल करन्सी सुरु करण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी गरजेचे
आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी डिजिटल करन्सी गरजेचे असल्याचे वक्तव्य इंडिया आइडियाज समिट मध्ये अर्थमंत्री सीतारमण यांनी केले होते.
वेळेसह खर्चाची बचत
अमेरिकन डिजिटल करन्सी आणि भारतीय डिजिटल करन्सी यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यवहार करणे अगदी सोपे होईल आणि रिअल टाईममध्ये व्यवहार पूर्ण होतील. व्यवहार पूर्ण होण्यासाठी वाट पहावी लागणार नाही.
देशातंर्गत युपीआयचा बोलबाला
तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, देशात आता युपीआयमुळे मोफत व्यवहाराची प्रक्रिया झटपट होत आहे. डिजिटल करन्सीमुळे त्याला आणखी प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे वेळेसह खर्चाची बचत होईल.
आंतरराष्ट्रीय चेहरा मिळेल
भारताच्या डिजिटल करन्सीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय रुपयाला आपोआप मोठा दर्जा प्राप्त होईल. आंतरराष्ट्रीय व्यवहार भारतीय रुपयात करणे सोपे होईल. खर्च आणि वेळेची बचत होईल.