RBI Repo Rate : कर्ज आणखी महाग होणार; ईएमआयचा हप्ताही वाढणार, ‘आरबीआय’कडून लवकरच रेपो रेट वाढीची घोषणा?

भारतातील सामान्य नागरिक दरररोज वाढत असलेल्या महागाईमुळे (inflation) चिंतेत आहे. महागाई रोखण्यासाठी आरबीआय (RBI) आता पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे.

RBI Repo Rate : कर्ज आणखी महाग होणार; ईएमआयचा हप्ताही वाढणार, 'आरबीआय'कडून लवकरच रेपो रेट वाढीची घोषणा?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 2:10 AM

नवी दिल्ली : भारतातील सामान्य नागरिक दरररोज वाढत असलेल्या महागाईमुळे (inflation) चिंतेत आहे. महागाई रोखण्यासाठी आरबीआय (RBI) कोणती पावलं उचलणार याककडे सगळ्याचं लक्ष आहे. अमेरिकेच्या फेडरल बँकेनं व्याज दरात वाढ केल्यानंतर आता आरबीआय किरकोळ महागाई रोखण्यासाठी व्याज दरात (Repo Rate) 0.35 टक्के वाढ करू शकते. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक येत्या तीन ऑगस्टपासून सुरू होणार आहे. समिती पाच तारखेला बैठकीतील निर्णयाची घोषणा करणार आहे. महागाईवर लगाम घालण्यासाठी आरबीआय रेपो रेट वाढवण्याची शक्यता आहे. किरकोळ महागाई सहा टक्क्यांच्यावर असल्यानं आरबीआयनं रेपो रेट मे आणि जून महिन्यात 40 बेसिस पॉईंट आणि 50 बेसिस पॉईंटनं वाढवलाय.आता पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यात आरबीआय रेपो रेटमध्ये वाढ करण्याची दाट शक्यता आहे.

अहवाल काय सांगतो

अमेरिकन ब्रोकरेज कंपनी बोफा सिक्युरिटीजच्या अहवालातही आरबीआयकडून रेपो रेट 0.35 टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय.दरम्यान रेपो रेट वाढल्यानंतर कर्ज आणखी महाग होणार आहे. तसेच गृहकर्जांसह सर्वच कर्जाचा हप्ता महाग होणार आहे. बँक ऑफ बडोदाच्या अहवालात म्हटलंय की फेडरल रिझर्व्हनं 2022 मध्ये आतापर्यंत रोपो रेटमध्ये 2.25 टक्के वाढ केलीये. त्यामुळे आरबीआयसुद्धा रेपो दरात वाढ करू शकते. मात्र, भारताची सध्याची परिस्थिती पाहता रेपो रेटमध्ये खूप वाढ करण्याची गरज नसल्याचं बँक ऑफ बडोदाच्या अहवालात म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

ईएमआय आणखी महागणार?

हाऊसिंग.कॉमचे सीईओ ध्रूव अग्रवाल म्हणतात अमेरिकेसह जगभरातील मध्यवर्ती बँका व्याज दरात वाढ करत आहेत. मात्र, भारतात तशी परिस्थिती नाही. परदेशाप्रमाणे मोठ्या प्रमाणात व्याज दरात वाढ करण्याची गरज नाही. आरबीआय 0.20 ते 0.25 टक्के व्याज दरात वाढ करेल असा अंदाज अग्रवाल यांनी व्यक्त केलाय. डीबीसी ग्रुपच्या संचालक आणि वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ राधिवा रावन यांनी त्यांच्या अहवालात म्हटलंय की रेपो दरात 0.35 टक्के वाढ होऊ शकते. आरबीआय पतधोरण ठरवाता किरकोळ महागाईचा दर विचारात घेते. किरकोळ महागाई जानेवारी 2022 पासून सहा टक्क्यांच्यावर आहे, तर जून महिन्यात 7.01 टक्के आहे. आता महागाईला लगाम घालण्यासाठी आरबीआय कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आरबीआयनं रेपो दरात वाढ केल्यास ऐन सणासुदीमध्ये सामान्य नागरिकांना महाग ईएमआयचा सामना करावा लागणार एवढं नक्की.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....