‘ही’ पेमेंट बँक कायमस्वरुपी बंद, तुमचे पैसे आताच काढून घ्या!

मुंबई : वोडाफोनच्या ‘एम-पेसा’ (m pesa) या पेमेंट बँकेने भारतातून गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे ‘एम-पेसा’च्या खातेधारकांना ठराविक अवधीपर्यंत आपल्या खात्यातील रक्कम काढून घ्यावी लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने एम-‘पेसा’चा परवाना रद्द (RBI revokes PPI licence of Payment Bank) केला आहे. वोडाफोनच्या ‘एम-पेसा’ या पेमेंट बँकेचं कामकाज आता बंद करण्यात आलं आहे. ‘एम-पेसा’च्या खातेधारकांना ठराविक […]

'ही' पेमेंट बँक कायमस्वरुपी बंद, तुमचे पैसे आताच काढून घ्या!
Follow us
| Updated on: Jan 22, 2020 | 2:04 PM

मुंबई : वोडाफोनच्या ‘एम-पेसा’ (m pesa) या पेमेंट बँकेने भारतातून गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे ‘एम-पेसा’च्या खातेधारकांना ठराविक अवधीपर्यंत आपल्या खात्यातील रक्कम काढून घ्यावी लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने एम-‘पेसा’चा परवाना रद्द (RBI revokes PPI licence of Payment Bank) केला आहे.

वोडाफोनच्या ‘एम-पेसा’ या पेमेंट बँकेचं कामकाज आता बंद करण्यात आलं आहे. ‘एम-पेसा’च्या खातेधारकांना ठराविक कालावधीत आपल्या खात्यातील रक्कम काढून घ्यावी लागणार आहे. सातत्याने होणाऱ्या नुकसानामुळे ‘वोडाफोन’ने आरबीआयकडे लिक्विडेशनसाठी अर्ज केला होता.

बँकिंग सेवा घराघरात पोहचवण्याच्या उद्देशाने ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने 2015 मध्ये पेमेंट बँक सुरु केली होती. देशातील 41 कंपन्यांनी ‘आरबीआय’कडे अर्ज केले होते. त्यापैकी 11 कंपन्यांना परवाना जारी करण्यात आला होता.

वोडाफोनने स्वेच्छेनेच ‘एम-पेसा’ लिक्विडेट म्हणजेच बंद करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने वोडाफोन ‘एम-पेसा’चं प्राधिकारण प्रमाणपत्र (सीओए – Certificate of Authorization) रद्द केलं आहे. त्यामुळे ‘एम-पेसा’ प्रीपेडशी निगडीत व्यवहार करु शकणार नाही. थोडक्यात पेमेंट बँकेच्या कामकाजाला खीळ बसली आहे.

ग्राहक किंवा व्यापाऱ्यांचा पेमेंट सिस्टम ऑपरेटरच्या रुपात (पीएसओ – Payment system Operator) कुठला वैध दावा असेल, तर सीओए रद्द झाल्यानंतरही तीन वर्षांच्या आत (30 सप्टेंबर 2022) ते दावा दाखल करु शकतात. या डेडलाईनपूर्वीच ग्राहकांना आपले दावा निकाली काढावे लागतील.

SBI ग्राहकांना फटका, FD वरील व्याज दरात कपात

गेल्या वर्षी आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक लिमिटेड (एबीआयपीबीएल)नेही आरबीआयकडे पेमेंट बँक लिक्विडेट करण्यासाठी अर्ज केला होता.

पेमेंट बँक नेमकी काय असते?

अल्पबचत खातेधारक किंवा लघु उत्पन्न कुटुंब, असंघटित क्षेत्र, प्रवासी मजूर किंवा लहान व्यावसायिकांना बँकिंग सेवेशी जोडण्याच्या उद्देशाने पेमेंट बँक लाँच करण्यात आली. रिझर्व्ह बँकेने नॉन बँकिंग फायनान्शिअल कॉर्पोरेशन, मोबाईल फोन सेवा कंपन्या किंवा सुपरमार्केट चेन्सना पेमेंट बँक सुरु करण्यास सवलत दिली होती.

सध्या केवळ पेटीएम, एअरटेल, जिओ, फिनो आणि इंडिया पोस्ट या पाचच पेमेंट बँक (RBI revokes PPI licence of Payment Bank) कार्यरत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.