सचिन बन्सल यांना RBI चा झटका; बँकिंग क्षेत्रात पाऊल ठेवण्याचे स्वप्न भंगले, रिझर्व्ह बँकेने अर्ज फेटाळला

फ्लिपकार्टच्या सचिन बन्सल यांच्या नेतृत्वाखालील चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनींचा बँका सुरू करण्याचा निर्णय आरबीआयने फेटाळला आहे. या अर्जासह केंद्रीय बॅंकेने एकूण सहा कंपन्यांचे अर्ज फेटाळले आहेत.

सचिन बन्सल यांना RBI चा झटका; बँकिंग क्षेत्रात पाऊल ठेवण्याचे स्वप्न भंगले, रिझर्व्ह बँकेने अर्ज फेटाळला
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 11:00 AM

फ्लिपकार्टच्या सचिन बन्सल यांना RBI ने तगडा झटका दिला आहे. बॅकिंग क्षेत्रात पाऊल ठेवण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकांच्या स्थापनेसाठीचे सहा अर्ज (Application) फेटाळून लावले आहेत. यामध्ये लघु वित्तीय बॅंकांच्या (Small Finance Bank) अर्जांचाही समावेश आहे. हे अर्ज योग्य न वाटल्याने ते फेटाळण्यात आले आहेत, असे आरबीआयने निवेदनात म्हटले आहे. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, या अर्जांच्या छाननीची प्रक्रिया विहित नियमांनुसार पूर्ण करण्यात आली आहे. या काळात बँका स्थापन करण्यासाठी हे अर्ज तत्त्वत: मान्यता मिळण्यास पात्र नाहीत, असे आढळून आले. यात फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांच्या नेतृत्वाखालील चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रा.लिचा ही समावेश आहे.

कोणाचे अर्ज फेटाळले?

बँक श्रेणीत अयोग्य आढळलेले अर्ज हे युएई एक्सचेंज अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, रिपेट्रिएट्स सहकारी वित्त आणि विकास बँक लिमिटेड, चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड आणि पंकज वैश्य आणि इतरांचे होते. त्याचबरोबर स्मॉल फायनान्स बँक प्रकारात वेसॉफ्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आणि कालिकत सिटी सर्व्हिस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या कंपन्यांचे अर्ज अयोग्य असल्याचे आढळून आले आहे.

बँकिंग परवान्यासाठी एकूण 11 अर्ज प्राप्त

आरबीआयकडे बँक आणि स्मॉल फायनान्स बँक श्रेणीअंतर्गत एकूण 11 अर्ज आले होते. यासारखे पाच अर्ज अद्याप परवाना प्रक्रियेचा एक भाग आहेत. उर्वरित अर्जांची अद्याप तपासणी झालेली नाही, असे मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले आहे.उर्वरित अर्ज स्मॉल फायनान्स बँकांच्या स्थापनेशी संबंधित आहेत. हे अर्ज वेस्ट एंड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, अखिल कुमार गुप्ता, रिजनल रूरल फायनान्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, कॉस्मी फायनान्शिअल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड आणि टेली सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी केले आहेत.

हे सुद्धा वाचा

आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महागाईवर नियंत्रण

स्टेट ऑफ द इकॉनॉमी नावाच्या लेखात म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेने पुर्नप्राप्ती मजबूत केली आहे आणि बहुतेक आर्थिक क्षेत्रातील उलाढालींनी कोविड -19 पूर्वीची पातळी ओलांडली आहे. लेखानुसार, कोविड-19 महामारीच्या प्रभावावर मात करण्यासाठी भारताला आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मानवतेसाठी आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करावी लागली आहे. .या लेखानुसार शाश्वत आधारावर उच्च विकास दर गाठण्यासाठी सरकारने भांडवली खर्च वाढवून खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मात्र, या लेखात व्यक्त केलेली मते ही लेखकांची असून ही मते रिझर्व्ह बँकेच्या मतांचे प्रतिनिधित्व करत नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मंगळवारी सार्वजनिक बँकांच्या प्रमुखांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना व्याजदरात हळूहळू वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.