Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका; आरबीआयची अ‍ॅक्सिस, आयडीबीआय बँकेवर कारवाई

अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) आणि आयडीबीआय बँक (IDBI Bank) ला भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेकडून दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने घालून दिलेल्या विविध नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणात हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका; आरबीआयची अ‍ॅक्सिस, आयडीबीआय बँकेवर कारवाई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाImage Credit source: Wikipedia
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 6:43 AM

अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) आणि आयडीबीआय बँक (IDBI Bank) ला भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेकडून दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने घालून दिलेल्या विविध नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणात हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. केवायसी गाईडलाईन्स (KYC guidelines)चे उल्लंघन तसचे ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जे नियम तयार केले आहेत, त्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका संबंधित बँकांवर ठेवण्यात आला आहे. अ‍ॅक्सिस बँकेला 93 लाखांचा तर आयडीबीआय बँकेला 90 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी देखील अनेक बँकांकडून नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दंड वसूल करण्यात आला आहे. तर काही बँकांचे परवाने देखील निलंबित करण्यात आले आहेत.

दंड का ठोठावला?

याबाबत माहीत देताना रिझर्व्ह बँकेच्या वतीने सांगण्यात आले की, ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून आरबीआयच्या वतीने केवासयी आणि बँक खात्यात मिनिमम बॅलन्स संदर्भात काही नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन अ‍ॅक्सिस बँक आणि आयडीबीआय बँकेकडून करण्यात आले. त्यामुळे त्यांना या प्रकरणात दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात अ‍ॅक्सिस बँकेला 93 लाखांचा तर आयडीबीआय बँकेला 90 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एका अन्य प्रकरणात सायबर सुरक्षा संबंधात आरबीआयने बनवलेल्या मापदंडाचे उल्लंघन केल्याचा देखील आयडीबीआय बँकेवर आरोप आहे. दरम्यान संबंधित दोनही बँकेला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे, याचा ग्राहक व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे आरबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

बँकांच्या विश्वस्त मंडळाची चौकशी

दरम्यान सध्या अ‍ॅक्सिस बँक आणि आयडीबीआय बँकेच्या विश्वस्त मंडळाची देखील स्पर्धा आयोगाकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात एसबीआयच्या ट्रस्टी युनिटचा देखील समावेश आहे. शुल्कासंदर्भातील संगनमताच्या प्रकरणात सीसीआयकडून ही चौकशी सुरू आहे. मात्र या प्रकारच्या चौकश्या या बँकिंग अंतर्गंत आहेत, त्यामुळे ग्राहकांच्या व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नसून, ग्राहकांचे व्यवहार सुरळीत सुरू राहातीलस असे बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Inflation: पेट्रोल, डिझेलची दरवाढ सर्वसामान्यांच्या मुळावर, महागाईत भरमसाठ वाढ

सीएनजी महागला आता टॅक्सीचे भाडे वाढवा; मुंबई टॅक्सी मेन्स युनियनची मागणी

म्युच्युअल फंडची कोटीची उड्डाण, एसआयपीकडे वाढता कल; हजारो कोटींची उलाढाल

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.