आरबीआयचा ग्राहकांना सुखद धक्का, ऑनलाईन ट्रांजेक्शनच्या नियमात दोन मोठे बदल, उद्यापासून लागू होणार नवे नियम

ऑनलाईन ट्रांजेक्शन अर्थात युपीआयच्या माध्यमातून व्यवाहार करणाऱ्या ग्राहकांना आरबीआयकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे, नवे नियम उद्यापासून लागू होणार आहेत.

आरबीआयचा ग्राहकांना सुखद धक्का, ऑनलाईन ट्रांजेक्शनच्या नियमात दोन मोठे बदल, उद्यापासून लागू होणार नवे नियम
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 6:50 PM

UPI Lite यूपीआय लाईटच्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. एक नोव्हेंबर 2024 पासून युपीआय लाईट प्लॅटफॉर्ममध्ये दोन महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. पहिला आणि महत्त्वाचा बदल म्हणजे आता यूपीआय लाईटच्या वापरकर्त्यांना पहिल्यापेक्षा जास्त पेमेंट करता येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयकडून ट्रांजेक्शनची लिमिट वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता युजर्सची पेमेंटची मर्यादा वाढणार आहे. दुसऱ्या बदलाबाबत बोलायचे झाल्यास एक नोव्हेंबरपासून जर तुमच्या UPI Lite चं बॅलन्स एका निश्चित मर्यादेपेक्षा कमी झाल्यास ऑटो टॉपच्या माध्यमातून तुमच्या खात्यातून त्यामध्ये पैसे अॅड होणार आहे, म्हणजे आता तुम्हाला मॅनुअली पैसे अॅड करण्याची गरज नाही.

हे नवे फिचर कधीपासून सुरू होणार?

UPI Lite ऑटो-टॉप-अप फिचर उद्यापासून म्हणजे एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. UPI Lite हे एक प्रकारचे वॉलेट आहे, जो यूजर्सशिवाय युपीआय पीनचा वापर करून छोट्या-मोठ्या ट्रांजेक्शनची सुविधान उपलब्ध करून देते.सध्या तुम्हाल जर युपीआय लाईटमधून पैशांचा व्यवाहार करायचा असेल तर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून युपीआय लाईटमध्ये पैसे जमा करावे लागतात. मात्र आता एक नोव्हेंबरपासून एका ठरावीक मर्यादेपर्यंत युपीआय लाईटमध्ये तुमच्या बँक खात्यातून डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला पैसे जमा करण्याची आवश्यकता नसणार आहे.एका निश्चित मर्यादेपेक्षा तुमच्या युपीआय लाईटचं बॅलन्स कमी झालं की तुमच्या खात्यामधून आपोआप तेवढे पैसे तुमच्या युपीआय लाईटमध्ये जमा होणार आहेत.

लिमिटमध्ये वाढ

UPI Lite द्वारे प्रत्येक युजरला पाचशे रुपयांपर्यंत व्यवहार करण्याची सुविधा मिळते. तर युपीआय लाईटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम ठेवू शकता. मात्र आता आरबीआयकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. युपीआय लाईटच्या ट्रांजेक्शनची मर्यादा वाढवण्यात आली असून, ती पाचशेवरून हजार करण्यात आली आहे. तसेच तुम्हाला आता तुमच्या युपीआय लाईटमध्ये दोन हजारांऐवजी चार हजारांपर्यंत रक्कम ठेवता येणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.