LIC on Adani Stocks : आरोपांच्या गदारोळात LIC चा जालीम जवाब! स्पष्टच सांगितले की..

LIC on Adani Stocks : अदानीवर सरकार मेहरबानी करत असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला. अदानीसाठीच सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एलआयसीला दावणीला बांधल्याचा आरोप होत असताना एलआयसीनेही बाजू मांडली आहे.

LIC on Adani Stocks : आरोपांच्या गदारोळात LIC चा जालीम जवाब! स्पष्टच सांगितले की..
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 10:16 AM

नवी दिल्ली : अदानी समूहावरुन (Adani Group) देशात नवे वादंग पेटले आहे. आतापर्यंत हिंडनबर्ग ही अमेरिकन संस्था, शेअर बाजार, गुंतवणूकदार असा हा मामला होता. पण आता त्याला राजकीय रंग चढला आहे. गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी केंद्र सरकारने मखमली पायघड्या अंथरल्याचा विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ असा सवाल करत केंद्र सरकारच्या हेतूवरच शंका उपस्थित केली. या सर्व गदारोळात अर्थातच एलआयसीत ( Life Insurance Corporation) आणि अदानी समूहात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. विरोधकांच्या बॉम्बगोळ्यानंतर केंद्र सरकारने स्पष्टीकरणाची ढाल पुढे केली आहे. एलआयसीकडून केंद्र सरकारने याप्रकरणात उत्तर मागितले होते. ते संसदेसमोर ठेवण्यात आले. पण पुढे गुंतवणुकीचे काय होणार याबाबतच्या शंकाना अजूनही पूर्ण विराम मिळालेला नाही.

केंद्र सरकारने विरोधकांच्या टीकेनंतर गुंतवणूकदारांना भरोसा देण्याचा, विश्वास देण्याचा प्रयत्न केला. एलआयसी कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी नियमांचे पालन करते. त्या नियमानुसारच गुंतवणूक करण्यात येते, अदानी यांच्या समूहात गुंतवणूक (LIC Investment In Adani Stocks) करतानाही नियमांचे पालन करण्यात आल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले. राजकीय हल्लाबोळ तीव्र झाल्यानंतर केंद्र सरकार समोर आले आहे.

राज्यसभेत (Rajyasabha) भाजपचे खासदार सुशील कुमार मोदी यांनी याविषयीचा प्रश्न विचारला होता. देशाचे अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी याविषयीचे उत्तर दिले. विमा अधिनियम, 1938, विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (Insurance Regulatory and Development Authority of India(IRDAI) गुंतवणूक नियमन 2016 यांच्या चौकटीतच गुंतवणूक करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे एलआयसीने अदानी समूहात लपून गुंतवणूक केलेली नाही. ही गुंतवणूक आणि तिचे कागदपत्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत.

हे सुद्धा वाचा

30 जानेवारी 2023 रोजी एलआयसीने अदानी समूहात (Adani Group) आणि तिच्या उप कंपन्यांमध्ये गुंतवणुकीबाबत स्पष्टीकरण दिले होते. एलआयसीने सांगितले की, गेल्या काही वर्षात त्यांनी अदानी समूहातील सर्व कंपन्या मिळून एकूण 30,129 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तितक्या किंमतीचे शेअर खरेदी केले आहेत. 27 जानेवारी 2023 रोजी या शेअरचे मूल्य 56,142 कोटी रुपये होते.

एलआयसीच्या दाव्यानुसार, शेअर आणि ऋण मिळून 31 डिसेंबर 2022 पर्यंत त्यांनी अदानी समूहात केलेल्या गुंतवणूकीचे मूल्य 35917.31 कोटी रुपये होतो. आजपर्यंत एलआयसीने अदानी समूहात एकूण 36,474.78 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.  त्याचे बाजार मूल्य जास्त आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.