Rekha Jhunjhunwala : हुरुन जागतिक श्रीमंतांच्या यादीत पटकावला क्रमांक, रेखा झुनझुनवाला यांची महिन्याची कमाई ऐकून व्हाल थक्क

Rekha Jhunjhunwala : भारतीय श्रीमंत महिलांपैकी रेखा झुनझुनवाला प्रसिद्धपासून थोड्या दूरच आहेत. त्या चार कंपन्यांच्या संचालक पदावर आहेत. त्यांची महिन्याची कमाई अनेकांना अचंबित करणारी आहे. किती आहे त्यांची महिन्याची कमाई?

Rekha Jhunjhunwala : हुरुन जागतिक श्रीमंतांच्या यादीत पटकावला क्रमांक, रेखा झुनझुनवाला यांची महिन्याची कमाई ऐकून व्हाल थक्क
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 10:59 AM

नवी दिल्ली : भारतीय श्रीमंत महिलांपैकी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) प्रसिद्धपासून थोड्या दूरच आहेत. त्या चार कंपन्यांच्या संचालक पदावर आहेत. शेअर बाजारात (Share Market) त्यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि त्यातून त्यांना मोठा परतावा मिळाला आहे. हुरुन जागतिक श्रीमंतांच्या यादीत त्यांनी स्थान मिळवलं आहे. भारतीय शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पत्नी रेखा झुनझुनावाला यांनी शेअर बाजारातून जोरदार कमाई केली आहे. त्यांच्या पोर्टफोलिओतील संपत्ती त्यांना पतीकडून वारशाच्या रुपाने मिळाली आहे. राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफे सुद्धा म्हटल्या जाते. त्यांच्या अचूक आणि योग्य गुंतवणूकीचा फायदा रेखा झुनझुनवाला यांना झाला आहे.

कोण आहेत रेखा झुनझुनवाला

रेखा झुनझुनवाला यांचा जन्म 12 सप्टेंबर 1963 रोजी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली. 1987 साली त्यांनी राकेश झुनझुनवाला यांच्याशी लग्न केले. त्यावेळी राकेश झुनझुनवाला शेअर बाजारात हिट बॅट्समन म्हणून ओळखले जात. त्यांना तीन मुलं आहेत. निष्ठा, आर्यमन आणि आर्यवीर अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.

हे सुद्धा वाचा

दरमहिन्याला इतकी मोठी कमाई

Financialexpress मधील एका अहवालानुसार, रेखा झुनझुनवाला दर महिन्याला जवळपास 650 कोटी रुपये कमवितात. Trendlyne ने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार, रेखा झुनझुनवाला यांचे 29 कंपन्यांमध्ये शेअर आहेत. या शेअर्सचे नेटवर्थ जवळपास 25,655 रुपये आहे.

शेअरमधून फायदा

रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीतूनही मोठी कमाई केली होती. पण सध्या ज्या दोन कंपन्यांच्या स्टॉकमधून त्यांनी कमाई केली. त्यात एक मेट्रो ब्रॅड्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स यांचा समावेश आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे न कंपनीचे 10,07,53,935 शेअर वा 17.50 टक्क्यांची हिस्सेदारी आली. त्यातून त्यांच्या कमाईत मोठी भर पडली आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीत मेट्रो ब्रँड्सच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे मेट्रो ब्रँड्सचे 3,91,53,600 शेअर आहेत. त्यांचे पती राकेश झुनझुनवाला प्री-आयपीओ स्टेपनंतर या कंपनीतील गुंतवणूकदार आहेत. राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे हे संपूर्ण शेअर आले आहेत. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोत हे सर्व स्टॉक आले आहेत.

रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 3,91,53,600 मेट्रो ब्रँडसचे शेअर आहेत. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत जवळपास 179 कोटी रुपयांची वाढ झाली. गेल्या काही महिन्यात स्टार हेल्थ इन्शुरन्स आणि मेट्रो ब्रँडसमधील वृद्धीमुळे झुनझुनवाला यांच्या संपत्तीत एकूण 650 कोटी रुपयांहून अधिकची वाढ झाली.

आज त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्सचा समावेश आहे. यामध्ये सेल, टाटा मोटर्स, टाटा कम्युनिकेशन्स, ल्युपिन, टीव्ही18, डीबी रियल्टी, इंडियन हॉटेल्स, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, फेडरल बँक, करूर वैश्य बँक, एस्कॉर्ट्स लिमिटेड, टायटन कंपनी या कंपन्यांचा समावेश आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.