अबब 76,000 रुपयांची संपत्ती…ही महिला कशी काय बनली लेडी ‘वॉरेन बफे’

त्यांना केवळ शेअरबाजारातील गुंतवणूकीतून महिन्याकाठी 600 कोटीहून अधिक रुपयांची कमाई होत असते. त्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. तर देशातील शंभर सर्वात श्रीमंत व्यक्तीत त्यांच्या क्रमांक 28 वा आहे.

अबब 76,000 रुपयांची संपत्ती...ही महिला कशी काय बनली लेडी 'वॉरेन बफे'
Follow us
| Updated on: Oct 16, 2024 | 8:34 PM

जगातील सर्वात श्रीमंतापैकी एक असलेले वॉरेन बफे तर सर्वांना परिचित असतील. त्यांना गुंतवणूकीतून साम्राज्य उभे केले. तशाच प्रकारे भारतातील या लेडी वॉरेन बफेने आपले 76,000 कोटींचे साम्राज्य उभे केलेले आहे. या आहेत दिग्गज शेअर मार्केट गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला. पती राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर रेखा झुनझुनवाला यांनी त्यांचा कारभार केवळ सांभाळलाच नाही तर तो वाढवला देखील आहे.त्यांनी गुंतवणूकीतून हजारो कोटीची संपत्ती उभी केली आहे. रेखा झुनझुनवाला पोर्टफोलिओत आता 27 कंपन्यांचे शेअर आहेत. त्यांची किंमतच 76000 कोटी रुपयांच्या बरोबर आहेत.

कोण आहेत रेखा झुनझुनवाला ?

12 सप्टेंबर 1963 रोजी जन्म झालेल्या रेखा झुनझुनवाला यांचे नाव शेअरबाजारातील मोठ्या गुंतवणूकदार म्हणून घेतला जातो. त्यांना महिन्याला कोट्यवधीची कमाई होते. त्यांच्या पोर्टफोलियात टायटन सारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर आहेत. त्यामुळे त्यांना मोठा फायदा होतो आहे. साल 1987 मध्ये रेखा यांचे लग्न शेअर बाजाराती बिग बुल म्हटले जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांच्याशी झाले. रेखा आणि राकेश या दाम्पत्याला तीन मुले आहेत. मुलगी निष्ठा आणि मुले आर्यमन आणि आर्यवीर अशी त्यांची नावे आहेत. रेखा यांना त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर एक मजबूत पोर्टफोलियो वारसा म्हणून प्राप्त झाला आहे.

दर महिन्यास 600 कोटीहून अधिक कमाई

रेखा यांनी पती राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर त्यांची कंपनी RARE एंटरप्राइझेसचा कारभार सांभाळला आहे. या कंपनीचे नाव देखील राकेश आणि रेखा यांच्या सुरुवातीच्या इंग्रजी अक्षरांना मिळून तयार केलेले आहे. रेखा आपल्या गुंतवणूकीतून दर महिन्यास 600 कोटीहून अधिक रुपये सहज कमवित आहेत.

Tata ग्रुपची कंपनी TITAN मध्ये गुंतवणूक

टाटा समुहाच्या टायटन कंपनीत रेखा यांचे मोठ्या प्रमाणावर शेअर आहेत. असे म्हटले जाते टायटन कंपनीचे पाच टक्क्यांहून अधिक शेअर त्यांच्याकडे आहेत. एकदा त्यांनी या टायटन कंपनीच्या शेअर मार्फत केवळ पंधरा दिवसात 1000 कोटी रुपये कमावले होते.

रेखा झुनझुनवाला यांच्याकडे या कंपन्यांचे शेअर

रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोत अनेक मोठ्या कंपन्याचे शेअर्स आहेत. कॉनकॉर्ड बायोटेक, बाजार स्टाइल रिटेल, एनसीसी लिमिटेड, सिंगर इंडिया लिमिटेड, टाटा कम्युनिकेशन्स, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स, कॅनरा बँक, एस्कॉर्ट्स, जुबिलंट इंग्रेव्हिया, फेडरल बँक, क्रिसिल,राघव प्रोडक्टीव्हीटी , ऍपटेक, ऍग्रो टेक फूड्स, व्हॅलर इस्टेट, फोर्टिस हेल्थकेअर, जिओजित फायनान्शियल, इंडियन हॉटेल्स कंपनी, ज्युबिलंट फार्मोवा, करूर वैश्य बँक, सन फार्मा, टाटा मोटर्स, टायटन, वा टेक वाबग, वोक्हार्ट, नझारा टेक्नॉलॉजी आणि मेट्रो ब्रँड आदी कंपन्याचे शेअर्स आहेत.

8.9 अब्ज डॉलर संपत्तीची मालक

Forbes या बिझनेस मॅगझिनच्या मते रेखा झुनझुनवाला या 8.9 अब्ज डॉलर ( 76,000 कोटी रुपये ) संपत्तीच्या मालकीन आहेत. त्यांचे नाव साल 2024 मध्ये भारतातील शंभर सर्वात श्रीमंत लोकांत 28 व्या क्रमांकावर होते. त्या भारताच्या दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत. त्यांच्या वर केवळ सावित्री जिंदाल यांचे नाव असून त्यांची संपत्ती 3.65 लाख कोटी इतकी आहे.

Non Stop LIVE Update
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा.