Reliance AGM : विमा क्षेत्रात शांतीत क्रांती! आरोग्य आणि जीवन विम्यात रिलायन्सची उडी

Reliance AGM : डिजिटल आर्थिक क्षेत्रात जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज मोठी उलथापालथ करणार हे बाजारातील दिग्गजांना माहिती आहे. पण काल झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत विमा क्षेत्रात पण रिलायन्स दिग्गजांना हादरवणार हे स्पष्ट झाले. विमा क्षेत्रात क्रांती येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या घडामोडींचा ग्राहकांना मोठा फायदा होऊ शकतो.

Reliance AGM : विमा क्षेत्रात शांतीत क्रांती! आरोग्य आणि जीवन विम्यात रिलायन्सची उडी
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 8:48 AM

नवी दिल्ली | 29 ऑगस्ट 2023 : रिलायन्समध्ये (Reliance Company) नुकतीच मोठी घडामोड घडली. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज (JFSL) ही डिजिटल आर्थिक सेवांसाठी स्वतंत्र कंपनी बाजारात उतरविण्यात आली. कंपनीने शेअर बाजारात अजूनही मोठा दम दाखवला नाही. पण या कंपनीचे इरादे मात्र भारतीय बाजारात धुमाकूळ घालण्याचे आहे. डिजिटल आर्थिक सेवामध्ये या कंपनीचे अनेक दिग्गजांना आव्हान असेल. पण आता ही कंपनी विमा क्षेत्रात (Insurance Sector) पण मोठी उलथापालथ करण्याच्या तयारीत आहे. काल कंपनीची वार्षिक सर्वसाधारण बैठक झाली. त्यात विमा क्षेत्रात पण उतरण्याचा मनसुबा समोर आला. त्यामुळे आतापर्यंत ज्यांची विमा क्षेत्रात मक्तेदारी आहे, अशा कंपन्यांना जगाचा सक्सेस पासवर्ड आत्मसात करावा लागणार आहे. मरगळ झटकून ग्राहकांना अत्याधिक, आधुनिक सुविधा देणे गरजेचे आहे, नाहीतर कालओघात या कंपन्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.

काय आहे प्लॅन

जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज विमा क्षेत्रात उतरले, अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. डिजिटल इंटरफेसचा त्यासाठी बखूबी वापर करण्यात येईल. या माध्यमातून ग्राहकांना सहज, सरळ आणि स्वस्त आरोग्य, जीवन विमा खरेदी करता येईल. विमा क्षेत्रात मनमानी करणाऱ्या सरकारी आणि काही खासगी विमा कंपन्यांपुढे हे मोठे आव्हान ठरेल.

हे सुद्धा वाचा

जागतिक कंपनीशी हातमिळवणी

जिओ, विमा क्षेत्रात उतरल्याने अनेक दिग्गजांना झटका बसणार आहे. कारण या स्मार्ट विमा योजना केवळ योजना नसतील, तर एक पॅकेज असेल, ज्यात ग्राहकांना काही तरी वेगळं देण्याचा प्रयत्न करण्यात येऊ शकतो. त्यासाठी जागतिक विमा कंपन्यांशी रिलायन्स हातमिळवणी करणार आहे. त्यांच्या एनालिटिक्स डाटाचा वापर करण्यात येईल. विमा क्षेत्रात येत्या काही दिवसांत मोठी क्रांती होण्याची शक्यता आहे.

ब्लॅकरॉकशी करार

आर्थिक क्षेत्रात चांगल्या, दर्जेदार सोयी-सुविधा मिळण्यासाठी जिओने अमेरिकेतील सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकरॉकसोबत करार केला आहे. ब्लॅकरॉक ही कंपनी 11 ट्रिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा पण अधिकचे संपत्ती व्यवस्थापन करते.

कंपनीचे भांडवल किती

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेजच्या शेअरचे एकूण मूल्य 1,66,000 कोटी रुपये म्हणजे जवळपास 20 अब्ज डॉलर इतके आहे. या भांडवलाच्या आधारे JFSL ही भारताची 32 वी मोठी कंपनी ठरली आहे. या कंपनीने पदार्पणातच अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन, टाटा स्टील, कोल इंडिया, एचडीएफसी लाईफ, इंडियन ऑईल आणि बजाज ऑटोला मागे टाकले आहे.

बाजारात तीव्र स्पर्धा

शेअर होल्डर्स आणि क्रेडिटर्सच्या बैठकीत जिओ विभक्त करण्याच्या नवीन प्रस्तावाला मंजुरी मिळाली. 2 मे रोजी ही बैठक झाली होती. रिलायन्सच्या या नविन आर्थिक कंपनीत रिलायन्स पेमेंट सोल्यूशन्स (Reliance Payments Solutions), जियो पेमेंट्स बँक (Jio Payments Bank), रिलायन्स रिटेल फायनान्स (Reliance Retail Finance) आणि रिलायन्स रिटेल इन्शुरन्स ब्रोकिंग (Reliance Retail Insurance Broking) यांचा समावेश असेल. तज्ज्ञांच्या मते, बँका, एनबीएफसी आणि फिनटेक कंपन्यांना आता तगडे आव्हान असेल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.