Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani : रिलायन्सची गरुड भरारी! आतापर्यंतची केली रग्गड कमाई, मग तुमचा फायदा काय

Mukesh Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीजची जोरदार घौडदौड सुरु आहे. या कंपनीने आतापर्यंत जोरदार कामगिरी बजावली आहे. पण या तिमाहीत कंपनीने मोठी कमाल केली. कंपनीने इतका नफा कमाविला...

Mukesh Ambani : रिलायन्सची गरुड भरारी! आतापर्यंतची केली रग्गड कमाई, मग तुमचा फायदा काय
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 8:05 PM

नवी दिल्ली : देशाची दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (RIL) भारतीय बाजारात अधिराज्य आहे. किरकोळ बाजारात तर या कंपनीचा मोठा दबदबा आहे. इतर कोणताही मोठा समूह आता या कंपनीच्या समोर शड्डू ठोकत नसल्याची परिस्थिती आहे. रिलायन्स रिटलेच्या माध्यमातून परकीय कंपन्यांना भारतीय बाजारात तगडे आव्हान मिळत आहे. तर टेलिकॉम सेक्टरमध्ये रिलायन्सच्या तोडीस तोड कंपन्यांची संख्या बोटावर मोजण्या इतपत पण नाही. रिलायन्सने अनेक नवीन आणि जूने ब्रँड पंखाखाली घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामाध्यमातून मुकेश अंबानी (Mukesh Ambani) त्यांच्या उद्योगाचं साम्राज्य वाढवत आहेत. या तिमाहीत रिलायन्सने रेकॉर्डतोड नफा (Net Profit) कमाविला आहे.

Reliance Industries Q4 Results देशातील दिग्गज कंपनी रिलायन्सने आर्थिक वर्ष 2022-23 मधील मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात जोरदार कामगिरी बजावली आहे. त्यांचा निव्वळ नफा 19 टक्क्यांनी वाढला आहे. आता हा नफा 19,299 कोटींच्या घरात पोहचला आहे. कंपनीला आतापर्यंत एखाद्या तिमाहीत मिळालेला हा सर्वाधिक नफा आहे. रिलायन्स समूहाने जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीतील आर्थिक आकेडवारी जाहीर केली. यासंबंधीची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली. कंपनीला पेट्रो रसायन आणि तेलाच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळाले. तर किरकोळ बाजार आणि दूरसंचार उद्योगाने त्यांना मोठी साथ दिली.

घसरणीच्या चर्चेत आनंदवार्ता रिलायन्स कंपनीने एका वर्षातील पहिल्या समान तिमाहीत 16,203 कोटी रुपयांचा एकदम शुद्ध नफा कमाविला आहे. मात्र बाजारातील तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी या मोठ्या शुद्ध लाभाविषयी शंका व्यक्त केली आहे. त्यांना रिलायन्सच्या दाव्यावर विश्वास नाही. परंतु अमेरिकेकडून आयात करण्यात येणाऱ्या इथेनच्या दरात नरमाई आल्याने कंपनीला मोठा फायदा झाल्याचे मानण्यात येत आहे. यादरम्यान कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून ते 2.19 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. हे उत्पन्न गेल्यावर्षी 2.14 लाख कोटी रुपये होते. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 मध्ये 15,792 कोटी रुपयांच्या तुलनेत शुद्ध लाभात 22 टक्के वाढ झाली.

हे सुद्धा वाचा

महसूलात मोठी वाढ आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये रिलायन्सचा शु्द्ध नफा 66,702 कोटी रुपये होता. रिलायन्सचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा फायदा आहे. या दरम्यान कंपनीचा महसूल 10 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचला. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये आरआयएलने 60,705 कोटी शुद्ध लाभ कमाविला होता. त्यावेळी महसूल 7.36 लाख कोटी रुपये होता.

गुंतवणूकदारांना फायदा रिलायन्सच्या या घौडदौडीचा फायदा गुंतवणूकदारांना नक्कीच होईल. कंपनीचा शेअर वधारण्याची शक्यता आहे. त्यामुले इन्ट्रा डे बाजारात फायदा होऊ शकतो. तर कंपनी व्यवस्थापनाने काही निर्णय घेतल्यास त्याचाही फायदा होऊ शकतो. आतापर्यंत रिलायन्सने गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळवून दिला आहे.

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....