रिलायन्स होम फायनान्स डिफॉल्टरच्या यादीत, व्याजही नाही चुकवू शकली अनिल अंबानींची कंपनी

कंपनीची विविध बँक आणि वित्तीय संस्थांवर 4,358.48 कोटी रुपयांचे कर्ज आहे. कंपनीवर एकूण आर्थिक भार 13,126 कोटी आहे, ज्यामध्ये दीर्घकालीन आणि अल्प मुदतीच्या दोन्ही कर्जांचा समावेश आहे. (Reliance Home Finance in the list of defaulters, Anil Ambani's company could not pay even interest)

रिलायन्स होम फायनान्स डिफॉल्टरच्या यादीत, व्याजही नाही चुकवू शकली अनिल अंबानींची कंपनी
अनिल अंबानींना मोठा झटका
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 12:53 PM

मुंबई : अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स होम फायनान्स पुन्हा एकदा डिफॉल्टरच्या यादीत गेली आहे. कंपनीने पंजाब अॅण्ड सिंध बँकेचे कर्ज वेळेत न चुकवल्यामुळे डिफॉल्टरमध्ये टाकण्यात आले आहे. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडने (आरएचएफएल) शनिवारी सांगितले की, पंजाब आणि सिंध बँकेच्या 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे पेमेंट भरु शकले नाही. कंपनीकडे रोख रक्कम असूनही कोर्टाच्या आदेशामुळे ते त्यांचा वापर करू शकले नसल्याने पेमेंट भरता आले नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. अनिल अंबानींच्या नियंत्रणाखालील रिलायन्स कॅपिटलच्या सहाय्यक कंपनीने 15 फेब्रुवारी 2021 रोजी कर्जाची परतफेड करु शकले नाही. कंपनीला 40 कोटींचे कर्ज आणि 15 लाख रुपयांचे व्याज वेळेवर परत करता आले नाही. (Reliance Home Finance in the list of defaulters, Anil Ambani’s company could not pay even interest)

पंजाब अॅण्ड सिंध बँकेचे 200 कोटींचे कर्ज

पंजाब अॅण्ड सिंध बँकेकडून पाच वर्षांच्या कालावधीसाठी 9.25 टक्के दराने 200 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे कंपनीने शेअर बाजारांना सांगितले. कंपनीने सांगितले की, त्यांच्याकडे निव्वळ रोख रक्कम 1,500 कोटींपेक्षा जास्त आहे. तथापि, दिल्ली उच्च न्यायालयाने 20 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्या आदेशामुळे कंपनी या मालमत्तांचा वापर करू शकत नाही. कंपनीची विविध बँक आणि वित्तीय संस्थांवर 4,358.48 कोटी रुपयांचे कर्ज आहे. कंपनीवर एकूण आर्थिक भार 13,126 कोटी आहे, ज्यामध्ये दीर्घकालीन आणि अल्प मुदतीच्या दोन्ही कर्जांचा समावेश आहे. त्याशिवाय 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत या कर्जात व्याजदेखील समाविष्ट करण्यात आले आहे.

रिलायन्स कॅपिटलही पैसे देण्यास असमर्थ

याआधी रिलायन्स कॅपिटल नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स (एनसीडी) साठी व्याज देण्यास अयशस्वी ठरले होते. व्याजाची रक्कम 21 फेब्रुवारी रोजी भरायची होती, मात्र कंपनी ती भरु शकली नाही. रिलायन्स कॅपिटलची ही डिफॉल्टरची 49 वी वेळ होती.

एचडीएफसी, अॅक्सिस बँकांचे 11 हफ्ते भरले नाहीत

रिलायन्स कॅपिटल कर्जाच्या ओझ्याखाली आहे. कंपनीने 31 जानेवारी 2020 ते 30 जानेवारी 2021 पर्यंत एचडीएफसी बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेचे 11 हप्तेही भरलेले नाहीत. कंपनीला दरमहा एचडीएफसीला 4.77 कोटी आणि अॅक्सिस बँकेला केवळ व्याज स्वरूपात 71 लाख रुपये द्यायचे आहेत. कंपनीने एचडीएफसीकडून 524 कोटी आणि अ‍ॅक्सिस बँकेकडून 101 कोटी कर्ज घेतले आहे. एचडीएफसीचा व्याज दर 10.60 टक्के आहे तर अ‍ॅक्सिस बँकेचा व्याज दर 13 टक्के आहे. कंपनीवरील बँका आणि वित्तीय संस्थांचे एकूण कर्ज 706 कोटी रुपये आहे.

रिलायन्स कॅपिटलवर 20511 कोटींचा एकूण आर्थिक भार

कंपनीवर एकूण आर्थिक भार 20511 कोटी रुपये आहे. डिसेंबर तिमाहीचा निकाल जाहीर झाला असून या तिमाहीत कंपनीला एकूण 4018 कोटींचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचे एकूण नुकसान 135 कोटी होते. सप्टेंबर 2019 मध्ये केअर रेटिंग एजन्सीने रिलायन्स कॅपिटलचे 17000 कोटी कर्ज ‘डी’ ग्रेड डीफॉल्टमध्ये टाकले, यावरुन कर्जाच्या देयकाच्या बाबतीत कंपनीच्या स्थितीचा अंदाज यावरून काढता येतो. (Reliance Home Finance in the list of defaulters, Anil Ambani’s company could not pay even interest)

इतर बातम्या

‘नाणार प्रकल्प’ हातातून गमावू नका, राज्याला परवडणार नाही; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

Shahrukh Khan : ‘दिल्लीला कधीही सोडू शकणार नाही’, शाहरुख खान आई-वडिलांच्या कबरीसमोर नतमस्तक

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.