Reliance Industries : मुकेश अंबानीचे गुंतवणूकदारांना गिफ्ट, बोनस शेअरची देणार भेट, रिलायन्सने घेतला मोठा निर्णय

Reliance Industries Bonus Issue : रिलायन्स इंडस्ट्रीजने गुंतवणूकदारांसाठी आनंदवार्ता दिली आहे. RIL च्या व्यवस्थापकीय मंडळाच्या बैठकीत गुंतवणूकदारांना 1:1 बोनस शेअर देण्यास मंजुरी दिली आहे. ही वार्ता येताच गुंतवणूकदारांमध्ये आनंदाची लहर उसळली आहे.

Reliance Industries : मुकेश अंबानीचे गुंतवणूकदारांना गिफ्ट, बोनस शेअरची देणार भेट, रिलायन्सने घेतला मोठा निर्णय
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 5:01 PM

बाजारातील भांडवलानुसार, देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्सने गुंतवणूकदारांना गुरुवारी मोठं गिफ्ट दिले. मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या व्यवस्थापकीय बैठकीत गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आली. त्यानुसार गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर देण्यास मंजूरी देण्यात आली. कंपनीने शेअरधारकांसाठी एका शेअरवर एक शेअर मोफत देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या निर्णयाचा देशातील कोट्यवधी गुंतवणूकदारांना फायदा होईल.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (RIL) व्यवस्थापकीय मंडळाने 5 ऑगस्ट रोजी 1:1 बोनस देण्यास मंजूरी दिली. सप्टेंबर 2017 नंतर कंपनीने पहिल्यांदा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक शेअरधारकाला प्रत्येक शेअरवर एक शेअर मोफत मिळणार आहे. रिलायन्सने अजून बोनस शेअर कधी डीमॅट खात्यात जमा करणार याची तारीख सांगितलेली नाही.

कंपनीचे शेअर कॅपिटल वाढवले

हे सुद्धा वाचा

स्टॉक एक्सचेंजला रिलायन्सने या घडामोडींची माहिती दिली आहे. रिलायन्सने दिलेल्या माहितीनुसार, पात्र शेअरधारकाला 10 रुपयांच्या एका शेअरवर तितक्याच किंमतीचा एक शेअर मोफत देण्यास मंजूरी दिली आहे. शेअर कॅपिटल 15,000 कोटी रुपयांहून 50,000 कोटी रुपये करण्याला मंजूरी दिली आहे. या सर्व घडामोडीनंतर पण बाजारात रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण दिसली. बोनस शेअर मिळत असताना पण रिलायन्सचा शेअरमध्ये घसरण आल्याने सर्वांना धक्का बसला. बोनस शेअर कधी जमा करणार ही तारीख जाहीर न केल्याने ही घसरण आल्याचे मानल्या जाते. गुंतवणूकदारांनी कदाचित त्यांची नाराजी जाहीर केली आहे.

बोनस शेअरचा इतिहास

Reliance Industries ने यापूर्वी 2017, 2009 आणि 1997 मध्ये शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर दिला होता. सर्वात आधी 1983 मध्ये 3:5 या प्रमाणात बोनस शेअरचे वाटप करण्यात आले होते. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये जून 2024 च्या अखेरपर्यंत प्रमोटर्सकडे 50.33 टक्के हिस्सेदारी होती. कंपनीने यंदा एप्रिल महिन्यात आर्थिक वर्ष 2023-24 साठी शेअरधारकांना 10 रुपये प्रति शेअर देण्याची घोषणा केली आहे.

बीएसई आकडेवारीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजने यावर्षी आतापर्यंत 16.9 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यामध्ये 24.9 टक्क्यांची वाढ आलेली आहे. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या विस्तारासाठी नवीन योजना आखली आहे. त्यासाठी डीप-टेक आणि नवीन ऊर्जा पॉवर हाऊस निर्मितीचा संकल्प सोडला आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.