नवी दिल्ली | 11 ऑगस्ट 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीजमधून जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज ही कंपनी नुकतीच विभक्त झाली. या कंपनीच्या शेअरची किंमत बीएसई आणि एनएसईमध्ये निश्चित झाली. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या या नव्या कंपनीने आल्या आल्या बाजारात धमाल केली. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडने (JFSL ) स्पर्धकांना आस्मान दाखवले. नव्या कंपनीचे बाजारातील मूल्य 20 अब्ज डॉलरहून अधिक आहे. याबाबतीत JFSL गौतम अदानी यांच्या कोल इंडिया आणि इंडियन ऑईलपेक्षा आणि रतन टाटा यांच्या टाटा स्टीलपेक्षा पुढे आहे. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेजच्या शेअरची किंमत 20 जुलै रोजी निश्चित झाली. ही किंमत एनएसईवर 261.85 रुपये प्रति शेअरवर किंमत निश्चित झाली. रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना फटक्यात लॉटरी लागली. पण वायद्याप्रमाणे नवीन कंपनीचे शेअर तुमच्या डिमॅट खात्यात (Demat Account) जमा झाले की नाही?
शेअरचे मूल्य असे झाले निश्चित
नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर हा शेअर 261.85 रुपयांवर निश्चित झाला. या कंपनीचा आयपीओ दोन-तीन महिन्यांनी येईल. प्री-ओपन सत्रात एनएसईवर रिलायन्स शेअरची किंमत 2,580 रुपये प्रति शेअरपर्यंत पोहचली. यापूर्वी एनएसईवर क्लोजिंग प्राईस 2,841.85 रुपये होती. या दोन किंमती आधारभूत धरत 2,841.85—2,580 : 261.85 रुपये अशी शेअरची किंमत आली.
बीएसईवर काय आहे मूल्य
बीएसईवर स्पेशल प्री-ओपन सेशनमध्ये रिलायन्सच्या शेअरची किंमत 2,589 प्रति शेअरवर आली. तर एका दिवसापूर्वी शेअरची क्लोजिंग प्राईस 2,840 रुपये होती. या किंमती आधारभूत धरत बीएसईवर 2,840—2,589 : 251 रुपये अशी शेअरची किंमत निश्चित झाली.
निफ्टी 50 मध्ये स्थान
जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेजला यापूर्वीच निफ्टी 50 आणि सेन्सेक्समध्ये स्थान मिळाले आहे. जोपर्यत शेअर बाजारात ही कंपनी स्वतंत्रपणे सूचीबद्ध होत नाही, तोपर्यंत शेअरच्या किंमतीत कुठलाच बदल होणार नाही. 28 ऑगस्ट रोजी लिस्टिंगच्या तीन दिवसांच्या आता ही कंपनी निर्दशांकातून बाजूला करण्यात येईल.
खात्यात केले शेअर जमा
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर, गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केल्याचे जाहीर केले. कंपनीच्या ट्विटर हँडलनुसार, 10 ऑगस्ट रोजी हे शेअर, शेअरधारकांच्या डिमॅट खात्यात जमा करण्यात आले.
28 ऑगस्ट रोजी लिस्टिंग होण्याची शक्यता
स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग नंतर जेएफएसएलचे शेअर ट्रेडिंग करतील. या कंपनीची लिस्टिंग कधी होईल, याविषयीची अधिकृत घोषणा, माहिती कंपनीने दिलेली नाही. पण एका अंदाजानुसार येत्या 28 ऑगस्ट रोजी एजीएममध्ये जिओ शेअरच्या लिस्टिंगची घोषणा होऊ शकते.
गुंतणूकदारांचा असा फायदा
रिलायन्सचे 1000 शेअर असतील तर गुंतवणूकदारांना JFSLचे 1000 शेअर मिळतील. आता एका शेअरची किंमत 261.85 रुपये निश्चित झाली आहे. म्हणजे एका झटक्यात गुंतवणूकदारांना 2,61,850 रुपयांचा फायदा झाला. त्यांना एकदम लॉटरी लागली. हा शेअर आता जसा वधारेल. तसा गुंतवणूकदारांना फायदा होईल. गुंतवणूकदारांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी हाती लागली आहे.