Mukesh Ambani यांच्या रिलायन्सच भीम पराक्रम! 20 लाख कोटींचा गाठला माईलस्टोन

Mukesh Ambani | गेल्या दोन आठवड्यात रिलायन्स कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये जवळपास 1 लाख कोटी रुपयांहून वाढली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉक्सने 19 लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. 29 जानेवारी रोजी त्यांनी हा आकडा ओलांडला होता. आता ही कंपनी 20 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहचली आहे.

Mukesh Ambani यांच्या रिलायन्सच भीम पराक्रम! 20 लाख कोटींचा गाठला माईलस्टोन
Follow us
| Updated on: Feb 13, 2024 | 2:30 PM

नवी दिल्ली | 13 February 2024 : देशाची दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) अजून एक इतिहास रचला आहे. रिलायन्स कंपनी 20 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप असणारी पहिली कंपनी ठरली आहे. गेल्या एक आठवड्यात कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये जवळपास 1 लाख कोटींहून अधिकची वाढ झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉक्सने 19 लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला होता. मंगळवारी BSE वर रिलायन्सने 52 आठवड्यांचा उच्चांक 2957.80 रुपये गाठला. या शेअरमध्ये 1.89 टक्क्यांची वाढ दिसून आली.

2 आठवड्यात एक लाख कोटींचे वाढले मुल्य

गेल्या दोन आठवड्यत कंपनीचे स्टॉक मार्केटमधील भांडवल जवळपास 1 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉक्सने 19 लाख कोटी रुपयांचा आकडा 29 जानेवारी रोजी गाठला होता. 2024 मध्ये गुंतवणूकदारांनी रिलायन्सवर भरभरुन प्रेम केले. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर जवळपास 14 टक्क्यांनी वधारला.

हे सुद्धा वाचा

12 महिन्यांत 40 टक्क्यांची उसळी

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये एक वर्षात मोठी तेजी दिसून आली. कंपनीने जोरदार कामगिरी बजावली. गेल्या 12 महिन्यात या शेअरमध्ये जवळपास 40 टक्क्यांच्यावर पोहचला. यामध्ये सर्वात मोठा वाटा उपकंपनी जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेजचा (Jio Financial Services) आहे. जिओचे बाजारातील भांडवल या दरम्यान 1.70 लाख कोटी रुपयांनी वाढले.

2015 पासून रिलायन्सची आगेकूच

रिलायन्स इंडस्ट्रीजने 2015 पासून वार्षिक आधारावर ग्राहकांना जोरदार परतावा दिला आहे. केवळ 2014 मध्ये कंपनीच्या शेअरमध्ये 0.5 टक्क्यांची घसरण दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीजने 20 लाख कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. कंपनीने पुन्हा एकदा भारतीय मार्केटमध्ये दबदबा निर्माण केला आहे. ऑईलपासून ते टेलिकॉम सेक्टरपर्यंत अनेक क्षेत्रात या कंपनीचा दबदबा आहे.

हुरुन यादीत रिलायन्स पहिल्या क्रमांकावर

एक दिवसांपूर्वीच हुरुन इंडिया 500 यादी जाहीर झाली. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा दबदबा दिसून आला. कंपनी या यादीत पहिल्या स्थानावर आहे. सलग तिसऱ्या वर्षी कंपनीने हे कमाल करुन दाखवली. दुसऱ्या स्थानावर टीसीएस आणि एचडीएफसी बँक ही या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.