मुलीच्या शिक्षणात एक अडचण नि मुकेश अंबानी यांनी तयार केली टेलिकॉम क्षेत्रातील बलाढ्य कंपनी, Reliance Jio च्या भरारीची ही कथा

JIO Success Story : सध्या टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ सुरू आहे. ग्राहक जिओ, व्होडाफोन-आयडिया, एअरटेलला टाटा-बाय बाय करत आहेत. बीएसएनएलकडे पोर्टेबिलिटी वाढली आहे. पण जिओची कंपनीची स्थापना कशी झाली याची रंजक कथा तुम्हाला माहिती आहे का?

मुलीच्या शिक्षणात एक अडचण नि मुकेश अंबानी यांनी तयार केली टेलिकॉम क्षेत्रातील बलाढ्य कंपनी, Reliance Jio च्या भरारीची ही कथा
रिलायन्स जिओची कुळकथा
Follow us
| Updated on: Aug 16, 2024 | 9:16 AM

Reliance समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी हे जगातील आघाडीच्या उद्योजकांपैकी एक आहेत. त्यांच्या अनेक कंपन्या आघाडीवर आहेत. टेलिकॉम क्षेत्रात त्यांच्या जिओने मोठी मजल मारली आहे. जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये जिओची गणना होते. Free 4G डेटासह वर्ष 2016 मध्ये जिओची बाजारात धमाकेदार एंट्री झाली होती. सर्वाधिक ब्रॉडबँड वापरात भारत हा जगातील सर्वात अग्रेसर देश आहे. त्यामागे जिओने देशात आणलेली डेटा क्रांती आहे.

जिओ कंपनीची आयडिया आली अशी

तुम्हाला माहिती आहे का, जिओ स्थापन करण्याची कल्पना मुकेश अंबानी यांना कशी सुचली? धीरुभाई अंबानी यांच्यानंतर रिलायन्समध्ये वाटणी झाली. रिलायन्स टेलिकॉम कंपनी लहान भाऊ अनिल अंबानी याच्याकडे गेली. वर्ष 2018 मध्ये एका कार्यक्रमात बोलताना मुकेश अंबानी यांनी जिओ स्थापन्यामागील गुपित सांगितले. त्यांनी मुलगी ईशा अंबानी ही परदेशात शिकत होती. ती काही दिवसांसाठी भारतात आली. तेव्हा अभ्यास करताना तिने इंटरनेटची गती अगदीच कमी असल्याची तक्रार केली. त्यानंतर मुकेश अंबानी यांच्या मनात जिओ कंपनी सुरू करण्याची कल्पना आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2011 मध्ये ईशा ही येल विद्यापीठात शिक्षण घेत होती. सुट्यांमध्ये ती घरी आली. इंटरनेटची गती अत्यंत कमी असल्याने शाळेत सांगितलेल्या एका प्रकल्पाचा अहवाल तिला वेळेवर पोहचवण्यास अडचण आली. तिने इंटरनेटच्या स्पीडवरुन वडिलांकडे तक्रार केली. वेळेत अहवाल पाठवता येत नसल्याने तिला रडली. तेव्हाच भारतात गतिमान इंटरनेटचे युग आणण्याचे मुकेश अंबानी यांनी मनाशी पक्के केले.

हे सुद्धा वाचा

आता तर डिजिटलचे युग

मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याने पण सध्या डिजिटलचे युग असल्याची पुश्ती जोडली. टेलिकॉम म्हणजे केवळ कॉलिंग नसल्याचे त्याने सांगितले. आता अनेक काम परदेशात ऑनलाईन होत असल्याची माहिती त्याने वडिलांनी दिली. या सर्व चर्चेनंतर मुकेश अंबानी यांनी या क्षेत्रात क्रांती आणण्याचे ठरवले. वर्ष 2010 मध्ये मुकेश अंबानी यांनी इंफोटेल ब्रॉडबँड सर्व्हिसेज लिमिटेड या कंपनीचे 95% शेअर खरेदी केले. या कंपनीने देशातील 22 प्रदेशात 4G ब्रॉडबँडची सुविधा केली होती.

आता आहेत 48 कोटी ग्राहक

आयबीएसएल कंपनी 4800 कोटी रुपयांत खरेदी करण्यात आले. या कंपनीला मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ असे नाव दिले. त्यानंतर ती जिओ टेलिकॉम कंपनी झाली. मुकेश अंबानी यांनी सुरुवातीलाच जोरदार प्लॅन आणल्याने या कंपनीने मोठी भरारी घेतली. ती देशातील सर्वात मोठी ब्रॉडबँड कंपनी झाली. या कंपनीचे देशात जवळपास 48 कोटी ग्राहक आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.