Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Market Cap : मुकेश अंबानी यांना लॉटरी! खोऱ्याने ओढला पैसा, एकाच आठवड्यात इतक्या हजार कोटींची कमाई

Market Cap : मुकेश अंबानी यांना बंपर लॉटरी लागली. एकाच आठवड्यात रिलायन्सने खोऱ्याने पैसा ओढला, त्यांना एकाच आठवड्यात इतक्या हजार कोटींचा फायदा झाला.

Market Cap : मुकेश अंबानी यांना लॉटरी! खोऱ्याने ओढला पैसा, एकाच आठवड्यात इतक्या हजार कोटींची कमाई
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 4:01 PM

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात (Share Market) सातत्याने पडझडीचे सत्र सुरु आहे. हिंडनबर्ग अहवालानंतर तर शेअर बाजाराचे दिवसच फिरले होते. परदेशी गुंतवणूकदारांनी धडाधड गुंतवणूक काढली होती. त्यानंतर वेगवेगळ्या संकटांची मालिका सुरुच होती. मध्यंतरी काही दिवसात गुंतवणूकदारांची कमाई पण झाली. अशा परिस्थितीत बाजारातील टॉप 10 मधील 8 कंपन्यांचे नशीब पालटले. त्यांना बक्कळ कमाई करता आली. या कंपन्यांचे बाजारातील भांडवल गेल्या आठवड्यात 82,169.3 कोटी रुपयांनी वाढले. HDFC बँक आणि HDFC ने यामध्ये बाजी मारली. तर रिलायन्सने (Reliance) कमाईत चार चाँद लावले.  मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मोठा फायदा झाला.

आठवड्यात 1.42 टक्क्यांची वाढ निर्देशांकाच्या टॉप 10 मधील 8 कंपन्यांचे भांडवल वाढले. गेल्या आठवड्यात मंगळवारी (4 एप्रिल) रोजी महावीर जयंती आणि शुक्रवारी (7 एप्रिल ) रोजी गुड फ्रायडेमुळे दोन दिवस शेअर बाजार बंद होता. गेल्या आठवड्यात 30 शेअरचा बीएसई निर्देशांक 841.45 अंकांनी 1.42 टक्के वाढला.

या कंपन्यांना मोठा फायदा सेन्सेक्सने टॉप 10 कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसेज (TCS), एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी आणि आयटीसी सह आठ कंपन्यांचे बाजारातील मूल्यांकनात वाढ झाली आहे. तर इतर कंपन्यांना पण फायदा झाला. पण हा आकडा कमी आहे. तर काही तगड्या कंपन्यांना मोठा फटका बसला.

हे सुद्धा वाचा

किती वाढले भांडवल पुनरावलोकनाधीन आठवड्यात HDFC बँकेचे बाजारातील भांडवल 31,553.45 कोटी रुपयांहून वाढून 9,29,752.54 कोटी रुपयांवर पोहचले. HDFC चे बाजारातील मूल्य 8,877.55 कोटी रुपयांहून 5,00,878.67 कोटी रुपयांवर पोहचले. तर भारती एअरटेलचे बाजारातील भांडवल 9,533.48 कोटी रुपयांहून 4,27,111.07 कोटी रुपयांवर पोहचला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) मूल्य 6,731.76 कोटी रुपयांहून 15,83,824.42 कोटी रुपयांवर पोहचले. तर टीसीएसने 5,817.89 कोटी रुपयांची उसळी घेऊन 11,78,836.58 कोटी रुपयांवर पोहचले.

इन्फोसिसचे नुकसान ITC चे बाजारातील भांडवल 4,722.65 कोटी रुपयांहून वाढून 4,81,274.99 कोटी रुपये झाले. भारतीय स्टेट बँकेचा (SBI) नफा 3,792.96 रुपयांहून 4,71,174.89 कोटीपर्यंत पोहचला. हिंदुस्थान युनिलिव्हरचे (HUL) बाजारातील मूल्य 1,139.56 कोटी रुपयांहून 6,02,341.22 कोटी रुपये वाढले. तर इन्फोसिसला बाजारात फटका बसला. इन्फोसिसचे मूल्य 2,323.2 कोटी रुपयांनी घसरुन 5,89,966.72 रुपये राहिले. ICICI बँकेला 1,780.62 कोटींचे नुकसान झाले, बँकेचे मूल्य 6,10,751.98 रुपयांवर आले.

रिलायन्सची बाजी टॉप 10 कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) पहिल्या स्थानावर कायम आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, एचडीएफसी, आयटीसी, एसबीआय आणि भारती एअरटेलचे स्थान आहे. आता या कंपन्यांमध्ये गुंतणूक करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. त्यांच्या शेअरचे मूल्य वाढेल.

चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट.
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.