Reliance Retail चे ‘स्वदेश’ गिफ्ट, स्थानिक कारागिर, शिल्पकारांचे हात होणार मजबूत
Reliance Retail | देशातील कुशल कारागिर, शिल्पकार, हस्तकला, कुटीरउद्योग यांच्या क्षेत्रात पण रिलायन्सचा डंका वाजणार आहे. अनेक वर्षांपासून सरकारची मदत सोडली तर या गृहउद्योगांकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. या कला जीवंत ठेवण्यासाठी आणि त्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी रिलायन्स रिटेल दुवा ठरणार आहे.
नवी दिल्ली | 9 नोव्हेंबर 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीजने देशातील शिल्पकार आणि कुशल कारागिरांसाठी खास प्लॅटफॉर्म तयार केला आहे. तुम्ही शिल्पकार, कारगिर, हस्तकला क्षेत्रातील कुटीरउद्योग अथवा गृहउद्योग चालवत असाल तर हा प्लॅटफॉर्म तुमच्या मदतीला येऊ शकतो. रिलायन्सने देशातील पहिले ‘स्वदेश’ स्टोर उघडले आहे. तेलंगाणातील हैदराबादमध्ये हे स्टोअर सुरु झाले. रिलायन्स फाऊंडेशनच्या (Reliance Retail Opens Swadesh Store) संस्थापक नीता अंबानी यांनी त्याचे उद्धघाटन केले. अनेक वर्ष जुनी हस्तकला, शिल्पकला इतर कला जीवंत ठेवण्याचा हा जोरदार प्रयत्न म्हणावा लागेल. या क्षेत्राला आता नवसंजीवनी मिळाली आहे. रिलायन्सच्या या स्वदेशी स्टोअरमध्ये पारंपारिक कारगिरांच्या सामानाची विक्री होणार आहे.
पारंपारिक कला, कारगिरांना होणार मदत
‘स्वदेशी’ स्टोअरच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. भारतीय कला आणि शिल्प यांच्या विक्रीसाठी हा महत्वाचा प्लॅटफॉर्म ठरेल. देशातील लाखो कारागिरांना एक मंच यामुळे उपलब्ध झाला आहे. शिल्पकला हा भारताचा गौरव आहे, त्यासाठी एक मंच उपलब्ध करुन देणे आवश्यक होते, असे नीता अंबानी यांनी सांगितले. ही स्टोअर आता अमेरिका आणि युरोपमध्ये पण उघडण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक कारागिरांना मोठा रोजगार उपलब्ध होईल.
विशाल स्टोअर
हैदराबाद येथील स्वदेशी स्टोअर अत्यंत प्रशस्त आहे. हे स्टोअर 20 हजार चौरस फुटावर पसरलेले आहे. भारतीय हस्तकला आणि स्थानिक उद्योगांना जागतिक स्तरावर नावारुपाला आणण्याचा हा महत्वाचा प्रयत्न आहे. यामुळे स्थानिक कारगारिकांच्या हाताला रोजगार तर मिळेलच पण त्यांना चांगला पैसा पण मिळेल. त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. या स्टोअरमध्ये ‘Scan and Know’ ची सुविधा देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक कलेविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
मुंबईत पण स्वदेशी झोन
कारगिर आणि शिल्पकारांच्या मदतीसाठी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये एक स्वतंत्र स्वदेशी झोन तयार करण्यात आले आहे. या झोनमध्ये भारताच्या हस्तकला, शिल्पकला आणि इतर सामान खरेदी करता येऊ शकते. या झोनमधील सामान विक्रीचा पैसा कारागिराच्या खात्यात जमा होतो. रिलायन्स फाऊंडेशन लवकरच देशात एक आर्टिसन इनिशिएटिव्ह फॉर स्किल एनहान्समेंट केंद्राची (RAISE) स्थापना करणार आहे. संपूर्ण देशात याचे एकूण 18 केंद्र असतील. देशातील 600 अधिक कारगिरी या योजनेचा भाग असतील.