Mukesh Ambani : रिलायन्सचे विभाजन! बँकिंग क्षेत्रात आता त्सुनामी, मुकेश अंबानी गेम पलटणार

Mukesh Ambani : रिलायन्सचे विभाजन होणार आहे. हे विभाजन रिलायन्सच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. कारण यामुळे बँकिंग क्षेत्रात त्सुनामी येण्याची शक्यता आहे.

Mukesh Ambani : रिलायन्सचे विभाजन! बँकिंग क्षेत्रात आता त्सुनामी, मुकेश अंबानी गेम पलटणार
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 7:59 PM

नवी दिल्ली : भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) प्रत्येक क्षेत्रात दबदबा वाढवत आहेत. देशातील आर्थिक आणि बँकिंग क्षेत्रात लवकरच त्सुनामी आणण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी रिलायन्सचे विभाजन करण्यात येईल. रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (RSIL) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमधून वेगळी करण्यात येणार आहे. त्यांच्या या योजनेला शेअर होल्डर्स आणि क्रेडिटर्सकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे पेटीएम आणि बँकांना आता तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल.

जिओ आर्थिक क्षेत्रात प्रस्तावानुसार, आरएसआयएलचे नाव बदलून जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेज लिमिटेड (Jio Financial Services Limited) असेल. या विलिनीकरणातून रिलायन्सच्या सध्याच्या शेअर होल्डरला एक शेअरच्या मोबदल्यात नवीन कंपनीचा एक शेअर मिळेल. कंपनीच्या संचालक मंडळाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या विलिनीकरणाला मंजुरी दिली होती. नवीन कंपनीला दिवाळी अगोदर शेअर बाजारात सुचीबद्ध करण्यात येऊ शकते.

या कंपन्यांचा समावेश 2 मे रोजी झालेल्या शेअर होल्डर्स आणि क्रेडिटर्सच्या बैठकीत नवीन प्रस्तावाला मंजुरी मिळाली. रिलायन्सच्या या नविन आर्थिक कंपनीत रिलायन्स पेमेंट सोल्यूशन्स (Reliance Payments Solutions), जियो पेमेंट्स बँक (Jio Payments Bank), रिलायन्स रिटेल फायनान्स (Reliance Retail Finance) आणि रिलायन्स रिटेल इन्शुरन्स ब्रोकिंग (Reliance Retail Insurance Broking) यांचा समावेश असेल. तज्ज्ञांच्या मते, बँका, एनबीएफसी आणि फिनटेक कंपन्यांना आता तगडे आव्हान मिळू शकते.

हे सुद्धा वाचा

भारतातील 5 वी मोठी बँक जेफरीजच्या दाव्यानुसार, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसचे मार्केट व्हॅल्यूएशन 90,000 ते 1.5 लाख कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. नवीन कंपनीच्या शेअरची किंमत 179 रुपयांच्या जवळपास असेल. तर मॅक्युरी रिसर्चनुसार, नवीन कंपनी झाल्यानंतर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस देशातील आर्थिक क्षेत्रातील 5 वी मोठी बँका असेल. एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँक यानंतर जिओचा क्रमांक असेल. यंदा एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या दोघांचे विलिनीकरण होणार आहे. या विलिनीकरणानंतर एचडीएफसी बँक देशातील सर्वात मोठी फायनान्स कंपनी ठरेल.

बजाज, पेटीएम, फोनपेला टक्कर ॲनलिस्ट कंपनी जेफरीजच्या दाव्यानुसार, येत्या काही दिवसांत जिओ फायनान्शिअल सर्व्हिस बाजारात धुमाकूळ घालेल. ही कंपनी बाजारातील सध्याचे स्पर्धक बजाज फायनान्स, पेटीएम, फोनपेला जोरदार टक्कर देईल. जिओचे नेटवर्थ सर्वाधिक असल्याने बँकिंग सेक्टरमध्ये जिओ आता पाचव्या स्थानावर असेल. याआधारे जिओ फायनान्शिअल सर्व्हिस पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनाही मागे टाकेल.

रिलायन्स कुटुंबातील ग्राहकांना मोठा फायदा रिलायन्स कुटुंबातील ग्राहकांना या सेवेचा मोठा फायदा होईल. त्यांना आता कर्जासाठी, रिलायन्स स्टोअरमधील किंमती वस्तू खरेदीसाठी दुसऱ्या बँकेचे, आर्थिक सेवा पुरवठादारांची मदत घेण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यांना एकाच छताखाली सर्व सुविधा मिळतील. जानेवारी 2023 नुसार, जिओ टेलिकॉमकडे जवळपास 42.6 कोटी ग्राहक आहेत.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.